Connect with us

शिळी पोळी (चपाती) खाण्यामुळे या 4 मोठ्या आजारा मध्ये मिळतो फायदा

Food

शिळी पोळी (चपाती) खाण्यामुळे या 4 मोठ्या आजारा मध्ये मिळतो फायदा

अनेक लोक असे आहेत जे शिळ्या पोळी (चपाती) चे सेवन करत नाहीत कारण त्यांचे मानणे आहे कि शिळी पोळी खाण्यामुळे शरीराला नुकसान होऊ शकते. जर अन्न 12 तासा पेक्षा जास्त वेळ ठेवलेले असेल तर त्यास खाण्यामुळे फूड पॉइजनिंगची समस्या होऊ शकते या व्यतिरिक्त शिळया पदार्थामध्ये पौष्टिक तत्वांचे प्रमाण कमी होते ज्यामुळे असे अन्न खाण्यामुळे नुकसान होते. जर तुम्ही देखील शिळे अन्न पुन्हा गरम करून त्याचे सेवन करत असाल तर हे आपल्यासाठी नुकसानदायक होऊ शकते परंतु सगळ्याच वस्तू नुकसानदायक नसतात तर काही वस्तू अश्या देखील आहेत ज्या शिळ्या झाल्या नंतर देखील आपल्या आरोग्यास फायदेशीर असतात. यापैकीच एक आहे शिळी झालेली पोळी किंवा चपाती.

तुम्ही इतर कोणत्याही धान्या पासून बनवलेली पोळी जास्त काळ ठेवल्यानंतर सेवन करत असाल तर त्याचा फायदा होणार नाही पण जर पोळी गव्हा पासून बनलेली आहे आणि ती 12 ते 16 तास पहिले बनलेली असेल तर अशी पोळी सेवन केल्यामुळे फायदा मिळेल. तुम्ही रात्री उरलेली पोळी दुसऱ्या दिवशी सकाळी खाऊ शकता पण तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे कि पोळी जास्तच शिळी नसावी.

आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून शिळी पोळी सेवन करण्याचे आरोग्याला होणारे फायदे सांगत आहोत

शुगर स्तर नियंत्रण

ज्या व्यक्तींना मधुमेह किंवा शुगरचा त्रास असेल त्यांच्यासाठी शिळी पोळी सेवन करणे फायदेशीर ठरेल आणि या लोकांनी शिळ्या पोळीचे सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला शुगर लेवल कंट्रोल मध्ये ठेवायचे असेल तर तुम्ही शिळी पोळी 10 मिनिट थंड फिक्क्या दुधा मध्ये भिजत ठेवा त्यानंतर सेवन करा. अशी पोळी तुम्ही दिवसा कधीही सेवन करू शकता यामुळे तुम्हाला फायदा मिळेल.

ब्लड प्रेशर कंट्रोल

जर व्यक्ती ब्लड प्रेशरच्या समस्येने त्रस्त असेल तर अश्या स्थिती मध्ये अश्या व्यक्तीला थंड दुधाच्या सोबत शिळी पोळी सेवन केले पाहिजे. तुम्ही सकाळी नाश्ता म्हणून शिळी पोळी खाऊ शकता. तुम्ही असे केले तर तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रित राहील.

पोटाच्या समस्या दूर होतील

आजकाल अनियमित खानपान झाल्यामुळे पोटाच्या समस्या वाढलेल्या आहेत. ज्या लोकांना पोटाच्या समस्या त्रास देत असतील त्यांनी शिळी पोळी सेवन आवश्य केली पाहिजे हे एखाद्या औषधी पेक्षा कमी नाही. रात्री थंड दुधाच्या सोबत शिळी पोळी सेवन केल्याने बद्धकोष्ठता, एसिडीटी, पोटामध्ये जळजळ यासारख्या पोटाच्या सगळ्या समस्या दूर होतात.

अशक्त शरीरासाठी फायदेशीर

जर एखादा व्यक्ती अशक्त (सडपातळ) असेल तर त्याने शिळी पोळी सेवन केली पाहिजे यामुळे त्याचा अशक्तपणा दूर होईल आणि त्याच्या शरीरामध्ये शक्ती येईल. शरीराचा अशक्तपणा दूर करण्यासाठी शिळी पोळी खाणे हा एक चांगला उपाय आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top