entertenment

या मोठ्या 5 कंपन्यांची सुरवात अशी होती – उदाहरणार्थ सैमसंग विकत असे भाजी !

आज आम्ही ज्या कंपन्यांची माहीती देत आहोत त्या कंपन्या त्यांच्या सुरुवातीच्या काळात अगदीच वेगळ्या होत्या. या कंपन्यांनी अगदी लहान कामांपासून  आपल्या कामाची सुरुवात केली होती.

तर पाहूया आजच्या मोठ्या आणि प्रसिध्द कंपन्याची सुरुवात कशी होती.

सैमसंग

सैमसंग ची सुरुवात कोरिया मध्ये सन 1938 मध्ये एक भाजी विकणाऱ्या स्टोरच्या रुपात झाली होती. जेथे सुक्की मच्छी, भाजी आणि नुडल्स मिळत असे. सैमसंग ने इलेक्ट्रॉनिक सामान बनवणे 1960 मध्ये सुरु केले आणि आज सैमसंग जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक कंपन्यांच्या पैकी एक आहे.

सुजुकी

सुजुकी कंपनीची स्थापना 1909 मध्ये झाली होती. त्यावेळी ही कंपनी जापान मधील एका गावात कपडे शिवण्याचे काम करत असे. ग्राहकांची वाहनांना वाढती मागणी पाहून सुजुकी ने सन 1937 मध्ये एक छोटी कार बनवण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हा पासून आता पर्यंत सुजुकी मोटर्स या कामासाठी जगभरात ओळखली जाते.

नोकिया

नोकिया खरतर एक कागद मिल च्या रुपात 1865 मध्ये सुरु झालेली. कंपनीच्या मीलला नोकियावितृन नदीच्या जवळ बनवले होते आणि त्यामुळे या कंपनीला आपले नाव मिळाले. 1987 मध्ये नोकिया ने आपला पहिला फोन बनवला ज्याचे नाव होते मोबिरा सिटीमैन 900.

मोटोरोला

मोटोरोला ने आपली सुरुवात कार रेडियो बनवून केली होती. त्यानंतर मोटोरोला ने सन 1960 मध्ये फोन बनवणे सुरु केले. आज हिच कंपनी लिनोवो सोबत मिळून जगभरात आपले मोबाईल फोन विकत आहे.

हैवलेट पैकर्ड – HP

हैवलेट पैकर्ड सन 1947 मध्ये एक इंजिनियरिंग कंपनीच्या रुपात सुरु झाली होती. यानंतर कंपनीने अनेक उपकरणांचे निर्मिती केली. सन 1968 मध्ये कंपनीने आपला पहिला पर्सनल कॉम्प्यूटर लॉन्च केला होता.


Show More

Related Articles

Back to top button