Connect with us

ज्यास भिकारी समजून शोरूमच्या बाहेर काढत होते, सत्य समजल्यावर सर्वांची बोलती बंद झाली

People

ज्यास भिकारी समजून शोरूमच्या बाहेर काढत होते, सत्य समजल्यावर सर्वांची बोलती बंद झाली

असे म्हणतात की कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कपड्यावरून जज केले नाही पाहिजे. कारण अनेक श्रीमंत लोक साधे कपडे घालतात आणि साधे जीवन जगतात. तर याच्या विरुद्ध असे अनेक लोक आहेत जे आहेत गरीब मात्र फक्त दिखावा करण्यासाठी चांगले कपडे घालून फिरतात मात्र त्यांच्याकडे त्या चांगल्या कपड्या शिवाय काहीही नसते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे फक्त कपडे आणि तो जी श्रीमंती दाखवत आहे त्याच्यावर जाणे चुकीचे ठरते किंवा असे म्हंटले तरी चालेल की जर एखादा व्यक्ती अत्यंत गरीब दिसत असला तरी तो गरीब असेलच असे नाही. काही असाच मामला हल्ली समोर आला आहे.

खरतर हल्ली एका वयस्कर व्यक्तीचे फोटोज सोशल मिडियावर अत्यंत वायरल होत आहे. तसे पाहता आजकाल कोणत्याही व्यक्तीला सोशल मिडीयावर वायरल होण्यास वेळ लागत नाही. परंतु त्यासाठी त्या व्यक्तीमध्ये काहीतरी खास असणे आवश्यक आहे. ज्यामुळे लोक आकर्षित होतील. असेच काहीसे या व्यक्ती बद्दल झालेले आहे ज्यास पाहण्यासाठी आजकाल लोक गर्दी करत आहेत. असे सांगितले जात आहे की थाईलैंड मध्ये राहणारा हा व्यक्ती दिसण्यास अत्यंत साधारण आहे आणि त्याचा पेहराव तर अगदी भिकाऱ्या सारखा आहे. ज्यास पाहून लोक तो व्यक्ती भिकारी असावा असा गैरसमज करून घेतात.

हल्लीच हा व्यक्ती एका बाईक शोरूम मध्ये गेला जेथे त्याचा हा लुक पाहून लोकांनी त्याची टिंगल उडवली. बातम्यांच्या अनुसार हा व्यक्ती एक दिवस थाईलैंडच्या थोमास अलेक्स जवळील गाडीच्या शोरूम मध्ये गेला आणि तोही त्याच्या भिकारी लुक मध्ये. शोरूम मध्ये गेल्यानंतर त्याने पूर्ण शोरूम मध्ये फेरफटका मारला यानंतर मैनेजरला हार्ले डेविडसन बाईक दाखवण्यास सांगू लागला. त्या व्यक्तीने असे बोलताच तेथे असलेले सर्व कर्मचारी हसायला लागले आणि त्याला इग्नोर करू लागले.

शोरूमच्या स्टाफचा हा व्यवहार पाहून या व्यक्तीला वाईट वाटले आणि त्याने शोरूमच्या मालकास बोलवण्यास सांगितले. पहिले तर सर्व कर्मचारी त्याला मालिकाला भेटण्यासाठी अडवत होते परंतु त्याच्या आग्रहामुळे स्टाफने मालिकास बोलावले. मालिक आल्यानंतर त्याने त्याच्या सोबत झालेल्या सर्व व्यवहाराची कल्पना त्या मालकास दिली आणि त्याने सांगितले कि तुमचे कर्मचारी त्याला हार्ले डेविडसन दाखवत नाही आहेत. यावर त्या मालकाने स्वता त्याव्याक्तीला हार्ले डेविडसन बाईक दाखवली. मालकाने बाईक दाखवल्यामुळे पूर्ण स्टाफ आश्चर्यचकित झाला आणि गपचूप दोघांना 10 मिनिटे पाहत राहिला.

मालकाने ज्या बाईक बद्दल त्या व्यक्तीस सांगितले त्या बाईकची प्राईज 12 लाख रुपये होती. आश्चर्य तर तेव्हा झाले जेव्हा त्या व्यक्तीला ती बाईक आवडली आणि त्याने त्वरित 12 लाख काढून मालकास दिले. त्या वयस्कर व्यक्तीच्या राहणीमानावरून तेथे असलेल्या कोणत्याही व्यक्तीने स्वप्नात देखील कधी विचार केला नसेल की या व्यक्तीकडे लाखो रुपये असतील. या सर्व घटनेला तेथे असलेल्या एका मुलाने आपल्या कैमरा मध्ये शूट केले आणि त्या व्यक्तीचे फोटोज सोशल मिडीयावर टाकले. पाहता पाहता या व्यक्तीची गोष्ट वायरल झाली. या घटने नंतर एका महिलेने तो व्यक्ती आपला भाऊ असल्याचे सांगितले आणि पुढे सांगितले की तो व्यक्ती अत्यंत मेहनती आहे आणि त्याचे नेहमी स्वप्न होते की बाईक खरेदी करावी.

 

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top