dharmik

भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली ही गोष्ट, कोणाच्याही तेराव्याला जाण्याच्या अगोदर नक्की जाणून घ्या तुम्ही पण

या पृथ्वीवर जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचेच आहे, म्हणजेच त्याचा मृत्यू निश्चित आहे. आज पर्यंत असा एकही मानव असा जन्माला आला नाही जो नेहमी जिवंत राहील. हिंदू धर्माच्या मान्यते अनुसार जेव्हा एखादा व्यक्ती मरण पावतो तेव्हा त्याचा आत्मा शांतीसाठी पूजा-पाठ केला जातो. आणि त्याच्या कुटुंबियांकडून तेराव्या दिवसाचे भोजन दिले जाते. आता प्रश्न हा निर्माण होतो की कोणाच्या तेराव्याला जाऊन भोजन करणे योग्य आहे का, नाही?

हा 17 वा संस्कार कुठून आला?

लोकांच्या मनात हा प्रश्न नेहमी असतो. लोकांना त्या बद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. काही लोकांना कोणाच्याही तेराव्याचे भोजन ग्रहण करण्यास कोणतीही समस्या येत नाही, तर काही लोकांना तेराव्याचे जेवण चांगले वाटत नाही. हिंदू धर्मात 16 संस्कारांच्या बद्दल सांगितले गेले आहे. यामध्ये पहिला संस्कार गर्भाधान संस्कार आणि शेवटचा अंतिम संस्कार आहे. यानंतर कोणताही संस्कार होत नाही. कोणत्याही मनुष्याच्या जीवनात फक्त 16 संस्कार होतात. आता तुम्ही देखील विचार करत असाल की जर 16 संस्कार बोलले जातात तर हा 17 वा संस्कार कुठून आला?

श्रीकृष्णाने दुर्योधनास सांगितले संधी करण्यास

आज आम्ही तुम्हाला व्यवस्थित समजावण्यासाठी महाभारतातील एक गोष्ट सांगत आहोत. यानंतर तुम्हाला समजेल की कोणाच्या तेराव्याला (दिवसाला) जाणे चांगले आहे किंवा नाही. भगवान श्रीकृष्णाने स्वतः दुख किंवा शोक मध्ये करण्यात येणाऱ्या भोजनास उर्जाचा नाश करणारे सांगितले आहे. या गोष्टीच्या अनुसार महाभारताच्या युध्दाची सुरुवात होणार होती. महाभारताच्या युध्दाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाच्या घरी जाऊन त्याला संधी करण्यास सांगितले. श्रीकृष्णाने दुर्योधनास युध्द न करण्यास सांगितले. पण दुर्योधनाने श्रीकृष्णाचा प्रस्ताव फेटाळला आणि संधी केली नाही.

मन दुखी असेल तर भोजन ग्रहण केले नाही पाहिजे

यामुळे श्रीकृष्णास अत्यंत दुख झाले. श्रीकृष्ण त्वरित तेथून निघून गेले. जेव्हा श्रीकृष्ण जात होते तेव्हा दुर्योधन त्यांना भोजन ग्रहण करण्याचा आग्रह करत होता. दुर्योधनाचे म्हणणे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, “सम्प्रीति भोज्यानि आपदा भोज्यानि वा पुनै:” म्हणजे दुर्योधन जेव्हा भोजन देणाऱ्याचे आणि भोजन ग्रहण करणाऱ्याचे मन प्रसन्न असेल तेव्हाच भोजन ग्रहण केले पाहिजे. याच्या उलट जेव्हा दोघांच्या मनात दुख असेल तर अश्या स्थिती मध्ये भोजन ग्रहण नाही केले पाहिजे. महाभारताच्या या गोष्टीला नंतर मृत्युभोज सोबत जोडले गेले.

कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांच्या मनात अत्यंत दु:ख असते. अश्या स्थितीत कसे कोणीही आनंदित होऊन भोजनाचे आयोजन करू शकते. तर जे लोक भोजन करण्यासाठी आलेले असतात ते देखील दुखी मनानेच यामध्ये शामिल झालेले असतात. यासाठी या प्रकारच्या भोजनामुळे उर्जा नाश होतो. काही लोकांचे तर म्हणणे आहे की, तेराव्याचा संस्कार हा समाजातील काही हुशार लोकांच्या डोक्यातून निघालेले आहे. महर्षि दयानंद सरस्वती, पंडित श्रीराम शर्मा, स्वामी विवेकानंद यासारख्या लोकांनी मृत्यू नंतरच्या मृत्यूभोज आयोजनाचा मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्वादिष्ट भोजन खाऊन दुख दाखवणे म्हणजे एखाद्या ढोंगा पेक्षा कमी नाही.


Tags
Show More

Related Articles

Back to top button