money

मोबाईलच्या सिममुळे तुमच्या बँक खात्यातील सर्व पैसे जावू शकतात चोरीला, असे करू नका

ऑनलाईन गुन्हे आजकाल वाढले आहेत यामध्ये आर्थिक फसवणूक आणि चोरी हे देखील शामिल आहे. एखाद्या फेक नंबर वरून कॉल येणे, एसएमएस किंवा Whatsup वरून लिंक येणे यापासून सावध राहण्याची गरज आहे आणि तुम्ही तशी सावधानता बाळगत असाल अशी आशा आहे. पण हॅकर्स लोकांनी एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. यास ‘सिम स्वॅप’ म्हणतात आणि याच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने चोरी केली जाते आणि तुमचे सर्व पैसे चोरी केले जातात. या सिम स्वॅपचे स्मार्टफोन वापरणारे बळी पडत आहेत. जर तुम्ही देखील स्मार्टफोन वापरत असाल तर सिम स्वॅप काय आहे आणि या पासून कसे वाचता येते हे पुढे तुम्ही नक्की वाचा आणि तशी सावधानता बाळगा.

सिम स्वॅप म्हणजे नेमक काय ?

सिमकार्डमध्ये युजरचा डेटा सेव्ह असतो. सिम यूजरच्या ऑथेंटिकेशनसाठी देखील आता वापरला जातं. यामुळेच तुम्ही सिम शिवाय इतर कोणत्याही नेटवर्कशी नाही जोडले जावू शकत. तुमच्याकडे जे सिम आहे ते अचानक बंद होतं आणि दुसरा कोणतातरी व्यक्ती त्या सिमच्या मदतीने तुमच्या अकाऊंटमधील पैसे गायब करतो. तुमचा नंबर सिम हॅक करत हॅकर स्वत:च्या नावाने सुरु करतो. तुमचं अकाऊंट असलेल्या सगळ्या बँकांचा OTP तो जनरेट करतो आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या अकाऊंटमधील पैसे तो ट्रान्सफर करता.

कशी करतात फसवणूक?

सिम स्वॅप फसवणुकीचा सरळ मार्ग आहे. एका कॉलच्या माध्य़मातून हे सगळं सुरु होतं. तुमच्या फोनवर एक कॉल येतो. टेलीकॉम कंपनीचा एग्जीक्यूटिव बनून हॅकर तुम्हाला कॉल करतो. या कॉलवर तुमचं नेटवर्क आणखी चांगलं बनवण्यासाठी हॅकर ऑथेंटिकेट करण्यासाठी सांगितलं जातं. काही प्लॅन आणि ऑफर देखील सांगितले जातात. कॉलर तुम्हाला तुमच्या सिमच्या मागचा 20 डिजिट नंबर देखील विचारतो. हॅकर्सला तुम्ही 20 डिजिट नंबर दिला की, तो तुम्हाला 1 नंबर दाबायला सांगतो. यानंतर तुमचं सिम स्वॅप होतो. टेलीकॉम कंपनी यानंतर तुमची रिक्वेस्ट स्वीकारतो आणि तुमचं सिम बलॉक होतं आणि दुसऱ्या सिमवर तो नंबर सुरु होतो.

MNP च्या माध्यमातूनही होऊ शकतं सिम स्वॅप

MNP च्या माध्यमातून देखील तुमचं सिम स्वॅप होऊ शकतं. पण अशी प्रकरण अजून समोर आलेले नाहीत. पण हॅकर्ससाठी हा देखील एक ऑप्शन आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी तुम्ही मॅसेज पाठवता. त्यानंतर तुम्हाला एक कोड येतो. तो कोड जर चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागला तरी देखील सिम स्वॅप होऊ शकतं.

तुम्हाला जर नेटवर्क सर्विस कंपनीमधून बोलतो आहे असा फोन आला तर तुमची माहिती त्याला अजिबात शेअर करु नका. अनोळखी नंबरवरुन एसएमएस आला आणि त्याच कोणतीही लिंक असेल तर त्यालाही क्लिक करु नका. फोनवर तुमची माहिती कधीच कोणाला देऊ नका. बँक तुम्हाला फोन करुन तुमची माहिती कधीच विचारत नाही. प्रत्यक्ष बँकेत जावून तुम्हाला तुमची माहिती अपडेट करायची असते. तुमचे बँक डिटेल, मोबाईल डिटेल, एटीएम कार्डची माहिती, आधार क्रमांकाची माहिती कोणाला देऊ नका.


Show More

Related Articles

Back to top button