money

घरी असलेल्या 2 वस्तू पासून तयार होते ही पेस्ट, 10 रुपय देखील नाही होणार खर्च

जवळपास सर्वांच्याच घरामध्ये प्लास्टिकच्या बादल्या आणि मग असतात बादली आणि मग यांचा वापर सर्वात जास्त बाथरूम मध्ये होतो. वापर करून-करून याच्या आत मध्ये आणि बाहेरील बाजूने घान जमा होण्यास सुरुवात होते. सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे डाग पडतात. हे डाग स्वच्छ करून देखील दूर होत नाहीत.  परंतु एक अशी पेस्ट आहे जी तुम्ही तुमच्या घरी बनवू शकता यासाठी तुम्हाला फक्त 2 वस्तू मिक्स कराव्या लागतील. या पेस्टच्या मदतीने तुम्ही बादली आणि मग फक्त 2 मिनिटात चमकवू शकता.

बेकिंग सोडा आणि विनेगर पेस्ट

ही पेस्ट तयार करण्यासाठी तुम्हाला बेकिंग सोडा आणि विनेगर यांची आवश्यकता पडेल.

या दोन्ही वस्तू जवळपास सर्व घरामध्ये सहज उपलब्ध असतात.

मार्केट मध्ये 500ml व्हाईट विनेगर 140 रुपये आणि 100 ग्राम बेकिंग सोडा 10 ते 15 रुपया मध्ये मिळते.

ज्या प्लास्टिकच्या वस्तूला स्वच्छ करायचे आहे त्या प्रमाणे पेस्ट तयार करावी.

जसे प्लास्टिक मग साठी फक्त 1 लहान चमचा बेकिंग सोडा आणि 2 छोटे चमचे विनेगरची आवशकता राहील.

अशी बनवा पेस्ट

या पेस्टला बनवण्यासाठी फक्त 1 छोटा चमचा बेकिंग सोडा आणि 2 छोटे चमचे विनेगर लागेल. या गोष्टीकडे लक्ष द्या की ही पेस्ट जास्त घट्ट होणार नाही आणि पात्तळ देखील होणार नाही बेकिंग सोड्याचा गुण असतो की तो कोणत्याही वस्तूला फुगावाण्याचे काम करतो. केक, ढोकळा, बिस्कीट आणि इतर खाद्य पदार्था मध्ये याचा वापर या कारणामुळेच केला जातो.

अशी करा बादली आणि मगची स्वच्छता

तुम्हाला ज्या बादली आणि मगला स्वच्छ करायचे आहे त्यावर ही पेस्ट स्क्रबरचा मदतीने लावा.

आता त्यास हळूहळू घासावे. जेथे घाण आणि डाग जास्त असतील तेथे हि पेस्ट जास्त लावावी.

जवळपास 2 मिनिट चांगले घासल्या नंतर बादली आणि मग पाण्याने धुवून घ्यावे.

तुमची जुनी बादली आणि मग नवीन सारखे चमकायला लागतील.  ही पेस्ट 10 रुपया पेक्षा कमी किमती मध्ये तयार होते.


Show More

Related Articles

Back to top button