health

या पानाच्या रोजच्या सेवनाने होतात जबरदस्त फायदे, नाही घ्यावे लागणार कधीही औषध

आयुर्वेदाने आपल्याला बरेचकाही दिलेले आहे ज्याचा आपल्याला विसर पडलेला आहे आणि आपण कधी ते शोधण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही. पण चला आज आपण अश्या वनस्पतीची माहिती पाहू जिच्या रोजच्या सेवनामुळे तुमचे डॉक्टरकडे जाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपट्याला किंवा झाडा विशेष महत्व आहे. यास अत्यंत पवित्र मानले जाते आणि तुळशी ही विष्णू भगवानास प्रिय मानली जाते. या कारणामुळे हिंदू धर्मामध्ये तुळशीची पूजा पुरातन काळापासून केली जात आहे. तुळशीच्या झाडामध्ये अनेक औषधी गुण असतात. यामुळे आयुर्वेद मध्ये प्राचीन कालापासून तुळशीचा वापर अनेक प्रकारच्या आजारातील उपचारासाठी केला जातो. तुळशीची पाने रोगप्रतिकारक शक्ती वाढ करतात आणि संक्रमण रोगा पासून मुक्ती देतात. आज आम्ही तुम्हाला या आर्टिकल मधून तुळशीचे काय-काय फायदे आहेत या बद्दल माहिती देणार आहोत ज्या बद्दल कदाचित तुम्हाला माहिती नसेल.

बौद्धिकशक्ती वाढ

जर तुम्ही आपल्या मस्तीष्काची शक्ती वाढवू इच्छित असाल तर रोज तुळशीची 2 पाने सेवन पाण्याच्या सोबत करा. जर तुम्ही असे केले तर तुमची बुद्धी तेज होईल आणि तुमच्या बौद्धिकशक्ती मध्ये वाढ होईल.

रोगप्रतिकार क्षमता वाढवतो.

तुळशीच्या पानामध्ये अनेक आजारांचा उपचार करण्याची शक्ती आहे. आयुर्वेद अनुसार दररोज तुळशीची काही पाने चावून खाण्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढ होते.

जुनाट डोकेदुखी होईल गायब

असे बोलले जाते कि तुळशीच्या तेलाचे एक ते दोन थेंब नाकामध्ये टाकल्याने जुनाट डोकेदुखी बरी होते आणि सोबतच डोक्याच्या संबंधित अन्य आजार दूर होतात.

चमकती त्वचा

आयुर्वेद अनुसार तुळशीचे तेल नियमित पणे चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळतो आणि तुमचा चेहरा चमकदार होतो.

दातदुखी पासून सुटका

जेव्हा दातदुखीची समस्या असेल यासाठी काळी मिरी आणि तुळशीचे पाने यांची गोळी बनवून दाताच्या खाली ठेवा. जर तुम्ही असे केले तर काही वेळातच तुमची दातदुखी दूर होईल.

गळ्याची समस्या

जर व्यक्तीच्या गळ्यामध्ये काही समस्या येत असेल तर तुळशीच्या पानांचा रस कोमट पाण्यात मिक्स करून गुळण्या केल्याने गळ्याच्या समस्येत भरपूर फरक जाणवतो.

खोकला आणि अस्थमा मध्ये फायदेशीर

जर कोणास खोकला किंवा अस्थमा असेल तर तुळशीची पाने कांद्याचा रस आणि मध मिक्स करून मिश्रण तयार करा आणि हे मिश्रण चाटल्यामुळे कोरडा खोकला आणि अस्थमा यामध्ये आराम मिळतो.

सर्दी खोकला

लहान मुलांना सर्दी खोकल्याची समस्या जास्त होते यासाठी तुळशीच्या पानांचा रस आणि अदरक (आले) रस काही थेंब मधामध्ये मिक्स करून मुलांना दिल्यास सर्दी, खोकला आणि कफ यामध्ये आराम मिळतो.

आमचे सर्व मनोरंजक आणि ज्ञानवर्धक आर्टिकल प्रसिद्ध होताच वाचण्यासाठी आमचे Android App खालील लिंक वरून त्वरित डाऊनलोड करा.

Marathi Gold Live


Show More

Related Articles

Back to top button