moneyPeople

आज मोदीजी देऊ शकता नवीन घोषणा, तुम्ही तयार आहात का?

नोटबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झाले म्हणजेच गेल्यावर्षी 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी मोदीजींनी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद होत असल्याची घोषणा याच दिवशी केली होती. ज्यामुळे सामान्य गरिबा पासून ते श्रीमंत लोकांना सुध्दा बँकेच्या लाईन मध्ये उभे राहावे लागले होते.

अनेक लोकांना या नोटा बंद झाल्या मुळे जबरदस्त मानसिक धक्का बसला होता तर काही लोकांची तब्बेत बिघडली होती. कारणही तसेच होते कारण त्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीच्या कमाईची किंमत शून्य झाली होती. पण हे तात्पुरते होते कारण या जुन्या नोटा बदलून नवीन नोटा मिळणार होत्या फक्त काळजी त्या लोकांना होती ज्यांच्याकडे काळा पैसा होता. आणि खरेतर नोटबंदीच्या अनेक कारण पैकी एक कारण काळा पैसे जमा करणाऱ्यावर सर्जिकल स्ट्राईक करणे हा देखील होता. ज्यामध्ये आपल्या सर्वांच्या मदतीने मोदी सरकार याबाबतीत यशस्वी झाले आहे. आता गेल्यावर्षी घेतलेल्या या निर्णया नंतर मोदीची यावर्षी काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावर्षी मोदीजी त्यांनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय किती बरोबर होता आणि त्याचा सामान्य लोकांना, बॅंकांना, देशाच्या अर्थ व्यवस्थेला आणि सरकारला किती फायदा झाला याची घोषणा करू शकता. तसेही सरकारच्या वतीने एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे ज्यामध्ये नोटबंदीमुळे सरकारने काय साध्य केले या बद्दल माहीती देण्यात आली आहे.

मोदीजी कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने घेऊन जाणारी एकादी घोषणा करू शकतात कारण नोटबंदीच्या निर्णया मागे कॅशलेस अर्थव्यवस्था सुरुकरणे हे एक कारण राहिले आहे आणि त्या दिशेने पाउले उचलले जात असल्याचे पाहण्यात येत आहे. जसे बँक, मोबाईल, डीमॅट खाते इत्यादी आधार कार्डशी लिंक करणे इत्यादी. आता पहायचे आहे सरकार कोणते पुढचे पाऊल उचलणार आहे.

मोदीजी हे धक्कादायक निर्णय घेण्यासाठी प्रसिध्द झाले आहेत त्यामुळे आज रात्री पुन्हा ते कोणता धक्कादायक निर्णय घेतील याबद्दल सांगणे कठीण आहे. पण या लेखाच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की आपण आपल्या मनाची तयारी करून ठेवा कारण कोणताही निर्णय आला तरी घाबरून जाऊ नका कारण कोणत्याही धक्क्याची तीव्रता सुरुवातीला जोरदार जाणवते पण काही वेळ निघून गेला की ही तीव्रता कमी होते.

गेल्या वर्षी नोटबंदीच्या निर्णय झाला तेव्हा तुम्हा कदाचित मोठा धक्का बसला असेल पण आज तुम्हाला त्याबद्दल काही वाटत नसेल किंबहुना जे झाले ते चांगल्यासाठी झाले असेच वाटत असेल. त्यामुळे कोणती नवीन घोषणा येईल किंवा कदाचित येणार नाही त्याबद्दल विचार करू नका. सामान्य रहा, आरोग्याची काळजी घ्या.

हा लेख म्हणजे कोणतीही बातमी नाही. फक्त नोटबंदीमुळे काय झाले आणि पुढे काय होऊ शकते याबद्दलचे विचार आहेत. यामागचा आमचा उद्देश हा आहे की सरकारने एखादी नवी घोषणा केली तर तुम्ही घाबरून जाऊ नये हे सांगणे. कारण आम्ही दररोज जसे तुमच्या शारीरक आरोग्यासाठी फायदेशीर होतील अश्या टिप्स देतो तसेच तुमचे मानसिक आरोग्य सरकारच्या एखाद्या घोषणेमुळे अचानक बिघडू नये यासाठी मनाची पूर्व तयारी करण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर हा लेख इतरांच्या सोबत शेयर करण्यास विसरू नये.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : लकवा (Paralysis) झाल्यावर लगेच कराल हे उपाय तर रुग्णास काहीही होणार नाही


Show More

Related Articles

Back to top button