Connect with us

बैंड-एड तयार होण्या मागील रोमांटिक गोष्ट

People

बैंड-एड तयार होण्या मागील रोमांटिक गोष्ट

आपल्याला कापले किंवा जखम झाल्यावर सर्वात पहिले डोक्यात येते आणि आपण बिनधास्त होतो. बैंड-एड असे औषध आहे जे सहज प्रत्येक घरात मिळते आणि तेवढ्याच सहजतेने ते आपल्याला बरे करते.

याच सोबत बैंड-एड आपल्याला झालेल्या जखमेचे किटाणू आणि अन्य संसर्गा पासून सुरक्षा करतो. तुम्हा बैंड-एड कसे तयार झाले याच्या मागे एक रोमांटिक गोष्ट आहे हे माहीत नसेल. चला आज आम्ही तुम्हाला बैंड-एडच्या तयार होण्या मागील ती रोमांटिक गोष्ट सांगतो.

अर्ल डिक्सन नावाचे एक गृहस्थ जॉन्सन एंड जोन्सन मध्ये काम करत होते. त्यांचे नुकतेच जोसेफाइन नाइट  सोबत लग्न झाले होते. नवविवाहित या जोडप्याचे एकमेकांवर खूप प्रेम होते. पण अडचण ही होती की पत्नीला वारंवार किचनमध्ये काम करताना जखम होत असे. ती साफसफाई करत असताना किंवा स्वयपाक करत असताना नेहमी काहीना काही लागून जखम होत असे.

त्याशिवाय पुढील अडचण ही होती की काम करताना जखमेवर लावलेले औषध टिकत नसे. यामुळे दुखी झालेल्या डिक्सन ला एक युक्ती सुचली. डिक्सन ने चौकोनी चिकट पट्ट्या तयार केल्या. यावर त्याने गॉज आणि औषध लावले. याप्रकारे एक अशी पट्टी तयार झाली जी जोसेफिन ला कापले किंवा जखम झाल्यास लावण्यासाठी पहिलेच तयार होती. डिक्सन ने अश्या अनेक पट्ट्या तयार करून ठेवल्या. जॉन्सन एंड जॉन्सन ला या पट्ट्याच्या बद्दल समजले. त्यांना माहीत होते की या पट्ट्या 30 सेंकदा पेक्षा कमी वेळा मध्ये लावता येतात.

त्यांना ही कल्पना एवढी आवडली की 1924 साल येता येता डिक्सन ला कंपनीचा वाईस प्रेसिडेंट बनवले. त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये पण स्थान मिळाले. त्या दरम्यान बैंड-एड संपूर्ण जगात आवडली जाऊ लागली.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top