food

केळी काळी पडू नयेत म्हणून या ट्रीक्स नक्की वापरा

उन्हाळ्याच्या दिवसात तीव्र उष्णतेमुळे अनेकदा खाण्याची, जेवण्याची इच्छा होत नाही. अशावेळी अनेकजण केवळ फळं किंवा हलका फुलका आहार घेण्याकडे भर देतात.

उन्हाळ्याच्या दिवसात आंबा, फणसाचा मौसम असला तरीही केळं हे बारा महिने उपलब्ध असते. झटपट एनर्जी देण्यासाठी केळं फायदेशीर ठरतं. म्हणूनच उन्हाळयात तुम्ही केळी आणून ठेवत असाल पण उष्णता तीव्र असल्याने ती फार लवकर खराब होतात.  मधूमेहींच्या आहारात ‘ही’ एक भाजी असणं ठरू शकते बहूपयोगी !

केळ्यांना दीर्घकाळ टिकवण्यासाठी काय कराल ?

केळी मऊ, काळी पडू नयेत म्हणून ती क्लीन रॅपमध्ये गुंडाळून ठेवावीत. अ‍ॅल्युमिनियम फॉईलप्रमाणेच क्लीन रॅप असते. यामुळे केळी फार काळ टिकून राहण्यास मदत होते.

प्लॅस्टिक बॅगेमध्ये केळी फार काळ ठेवू नका. बाजारातून विकत आणल्यानंतर प्लॅस्टिकच्या बॅगेतून ती पटकन बाहेर काढून ठेवा. यामुळे केळी फार काळ टिकून राहतात.

केळी आणि नाशपाती हे एकमेकांच्या आजुबाजूला ठेवा. केळ्याच्या शेजारी कच्च नाशपातीचं फळ ठेवल्याने केळ हळूहळू पिकेल आणि  नाशपाती पटकन पिकते. यामुळे दुहेरी फायदा होतो.  रात्रीच्या वेळेस केळं खाणं आरोग्याला खरंच त्रासदायक ठरते का ?

एरवी केळी फ्रीजामध्ये साठवून ठेवल्यास ती फार पटकन पिकतात. पन केळी फारकाळ टिकवायची असतील तर ती प्लॅस्टिकच्या बॅगेत भरून पॅक करून ठेवा. असे केल्याने ती फार पटकन पिकत नाहीत. सोबतच टिकून राहण्यास मदत होते.  फणसाच्या आठळ्यांंचा आहारात या ‘4’ फायद्यांंसाठी समावेश करायलाच हवा !


Show More

Related Articles

Back to top button