Uncategorized

कुंडली मध्ये चंद्र स्थिती कमजोर असेल तर करा हे सोप्पे उपाय ज्यामुळे समस्या होतील दूर

आज आम्ही या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला काही खास माहिती सांगणार आहोत हि माहिती भगवान शंकराच्या पूजा आराधनेचे महत्व आणि उपाय या बद्दल आहे. भगवान शंकर यांना जीवनातील सुख शांती यांचे कारक आहेत असे मानले जाते. त्यामुळे भगवान शंकर यांच्या आराधने सोबत काही असे उपाय आहेत जे केल्याने आपल्या जीवनातील सगळ्या समस्याच दूर होऊ शकतात. आणि आपणास पाहिजे असलेल्या सगळ्या सुखाचा आनंदाचा आपल्याला लाभ होऊ शकतो.

शास्त्रा मध्ये मानले जाते कि भगवान शंकर हे चंद्र ग्रहावर नियंत्रण ठेवतात. आपल्याला माहीत आहेच की चंद्रमा भगवान शंकराच्या माथ्यावर विराजमान आहेत. चंद्र ग्रह वक्तीच्या मन, मानसिक स्थिती यांचे कारक आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडली मध्ये चंद्र ग्रह बलवान नसेल तर तो लवकर निराश होतो. तसेच त्याला मानसिक त्रास किंवा आजार असण्याची देखील शक्यता असते.

आज आपण या पोस्टच्या माध्यमातून चंद्र ग्रह मजबूत करण्यासाठी भगवान शंकराचे काही विशेष उपाय पाहणार आहोत. ज्या उपायांना केल्याने कुंडली मधील चंद्राची स्थिती मजबूत होण्यासाठी मदत होते तसेच चंद्राचा अशुभ प्रभावा पासून वाचता येते.

चंद्र शुभ स्थिती मध्ये होण्यासाठी सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर जल अर्पित करावे आणि “ॐ नमः शिवाय” मंत्र जाप करावा. तसेच दोन मुखी रुद्राक्ष परिधान करणे शुभ मानले जाते. जर पती-पत्नी मध्ये वादविवाद होत असतील किंवा दोघा पैकी एकाचे आरोग्य खराब राहत असेल तर सोमवार च्या दिवशी माता पार्वतीला सिंदूर अर्पण केल्याने शुभ फळ मिळतात. ज्या मुलींच्या लग्नामध्ये अडथळा येत असेल अश्या मुलींनी 16 सोमवार कोणत्याही सुवासिनी स्त्रीला कच्चे दूध दान दिल्याने विवाहातील अडथळे दूर होतात.

चंद्र हा मनाचा कारक आहे त्यामुळे त्यास बलवान केल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो कोणतेही कार्य आपण पूर्ण आत्मविश्वासाने करतो. वर दिलेले उपाय केल्यामुळे आपल्या कुंडली मध्ये चंद्र बलवान नसल्याने होणारे नुकसान कमी होते तसेच आपल्यास इच्छित असलेले फळ प्राप्त होते. वर दिलेले उपाय हे अत्यंत साधे आणि सोप्पे आहे त्यासाठी कोणत्याही मोठ्या खर्चाची आवश्यकता देखील नाही गरज आहे ती फक्त पूर्ण विश्वास ठेवून उपाय करण्याची जर पूर्ण विश्वास ठेवून कोणतीही शंका न बाळगता हे उपाय केले तर आपणास याचा फायदा नक्की होईल.

Related Articles

Back to top button