dharmik

वाईटातील वाईट नशीब देखील चमकवेल गणपती बाप्पाचा हा उपाय, फक्त करावे लागेल हे काम

या जगामध्ये काही लोक असे असतात ज्यांचे नशीब नेहमी वाईट राहते. ते कितीही प्रयत्न करत असले तरी दुर्भाग्य त्यांचा पिछा काही सोडत नाही. त्यांचे वाईट नशीब त्यांची कामे बिघडवतात किंवा कामामध्ये अडथळे उत्पन्न करतात. जर तुमच्या जीवनामध्ये देखील वाईट नशीब हातधुवून मागे लागले असेल तर टेंशन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला दुर्भाग्याला सौभाग्यात परिवर्तित करण्यासाठी उपाय सांगत आहोत. आजचा हा उपाय गणपतीच्या संबंधित आहे. गणपती बाप्पा हे विघ्णहर्ता आणि भाग्य विधाता मानले जातात. ते लोकांचे दुःख दूर करून त्यांचे नशीब चमकावतात. त्यामुळे या उपायांच्या मदतीने आपण त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गणपतीचा दिवस बुधवार मानला जातो त्यामुळे तुम्हाला हे याच दिवशी करायचे आहे. हा उपाय 21 दिवसा पर्यंत चालेल. यासाठी तुम्हाला काही विशेष साहित्य लागेल ते पुढील प्रमाणे आहे. तांब्याचा तांब्या, नारळ, गंगाजल, आंब्याची पाने, पूजेचा लाल धागा आणि सुपारी. हा उपाय करण्यासाठी बुधवारच्या दिवशी स्नान करून तयार राहावे. त्यानंतर गणपतीच्या समोर सर्व प्रथम तुपाचा दिवा लावावा. आता एका तांब्याच्या तांब्यात पाणी घालावे आणि त्यामध्ये काही थेंब गंगाजल मिक्स करावे. यानंतर आंब्याचे पाच पाने घ्यावी आणि त्यांना तांब्याच्या आत अश्या प्रकारे ठेवावे कि पानांचा अर्धा भाग पाण्यामध्ये आणि अर्धा तांब्याच्या बाहेर राहील. यानंतर त्यावर एक नारळ ठेवून कळस बनवावा. नारळाच्या वरील भागास लाल धागा बांधावा.

आता 21 सुपारी घ्या आणि पूजा घरामध्ये गणपती समोर ठेवा. आपणास वाटल्यास एका वेगळ्या थाळी मध्ये यांना ठेवू शकता. यानंतर गणपतीची आरती करावी. आरती संपल्यानंतर गणपती बाप्पा जवळ चांगल्या नशिबासाठी प्रार्थना करावी.आता कळसा मध्ये ठेवलेल्या पाण्याचे काही थेंब घरामध्ये शिंपडावे. लक्षात ठेवा तुम्हाला संपूर्ण पाणी संपवायचे नाही आहे. पण 21 दिवस या कळसाला गणपती जवळ ठेवायचे आहे. तर त्या 21 सुपाऱ्या रोज फोडून 21 दिवस खाव्यात. यास तुम्ही कुटुंबातील इतर सदस्यांसोबत वाटून खाऊ शकता.

जर तुम्ही हा उपाय पूर्ण विधी ने 21 दिवस केला तर तुम्हाला याचा परिणाम दिसायला लागेल. हा उपाय तुमचे वाईटातील वाईट भाग्य देखील चांगल्या नशिबात बदलेल. तुम्हाला वाटल्यास या 21 दिवसांच्या दरम्यान येणाऱ्या प्रत्येक बुधवारी तुम्ही गणपतीच्या नावाने उपवास करू शकता. परंतु हे ऑप्शनल आहे. अजून एक गोष्ट लक्षात असू द्या ती म्हणजे या 21 दिवसा दरम्यान नॉनव्हेज सेवन करू नये. सोबतच मद्य, सिगारेट, तंबाकू यासारख्या नशे पासून दूर राहावे.


Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button