foodhealthPeopleviral

सावधान: तारुण्‍यातच दिसाल म्‍हतारे, आजच सोडा या 10 सवयी

दिवसभराच्या धावपळीत आपण अशा चुका करतो, ज्याचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. या चुकांमुळे हार्ट डिसिज, कँसर, हाय ब्लड प्रेशर आणि किडनी डिसिज सारख्या गंभीर आजारांची शक्यता वाढते. याचा वाईट प्रभाव आपल्या वयावर पडतो आणि आणि आपण तारूण्‍यातच म्‍हतारे दिसू लागतो. जनरल फिजिशियन डॉ. दीपक चतुर्वेदी सांगत आहेत अशाच 10 वाईट सवयींविषयी ज्या वय कमी करतात…

स्कीन केयर प्रोडक्ट्सचा अतिरिक्त वापर

वेळो-वेळी स्कीन केयर प्रोडक्ट्स बदलल्यामुळे किंवा याच्या अतिरिक्त वापरामुळे स्कीन खराब होऊ शकते. स्कीनच्या आजाराचा धोका असतो.

दीर्घकाळ टिव्ही पाहणे

तासनतास टिव्ही समोर बसून टिव्ही पाहणे हार्टसाठी हानिकारक असते. कमी मुव्हमेंटमुळे ब्लड सर्कुलेशन योग्य प्रकारे होऊ शकत नाही, ज्यामुळे हार्टडिसीजचा धोका वाढतो.

उशिरा पर्यंत जागरण करणे

उशिरा पर्यंत जागल्यामुळे डिप्रेशन, लठ्ठपणा, स्ट्रेस, इनडायजेशन सारखे प्रोब्लेम होऊ शकतात. यामुळे तुमचे वय कमी होऊ शकते.

जास्त मीठ

जास्त मीठ खाण्यामुळे हाय ब्लडप्रेशर प्रोब्लेम होऊ शकतो. यामुळे किडनीवर विपरीत परिणाम आणि हार्ट अटैकचा धोका अनेक पटीने वाढतो.

ओव्हरइटिंग

ओव्हरइटिंग केल्याने लठ्ठपणा वाढतो. वजन जास्त असल्यावर बॉडीमध्ये कोलेस्ट्रोल लेवल वाढते.

कमी पाणी पिणे

दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे बॉडीतील टॉक्सिन्स बाहेर निघतात.

जास्त औषध खाणे

प्रत्येक लहान मोठ्या समस्येसाठी अँटीबायोटीक किंवा जास्त पेनकिलर्स घेण्याच्या सवयीमुळे किडनीवर वाईट परिणाम पडतो. खूप गरज नसेल तर हे औषध घेणे टाळावे.

खूप जास्त मद्यप्राशन

जास्त मद्यप्राशन केल्याने हाय ब्लडप्रेशर, हाय ब्लड फॅटस आणि हार्ट फेल्युअरची समस्या होऊ शकते. यामधून मिळणाऱ्या कैलरीमुळे वजन वाढते. जे हार्टसाठी धोका निर्माण करते.

स्मोकिंग

तंबाखूमुळे ब्लड क्लॉट होते. अशा वेळी बॉडीचे ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे होऊ शकत नाही. यामुळे हार्ट अटैकची शक्यता वाढते.

जास्त कोल्डड्रिंक पिणे

जापान मधील रिसर्चनुसार जास्त कोल्डड्रिंक किंवा सोडा पिण्यामुळे किडनीची समस्या होण्याची शक्यता वाढते. यामध्ये ओथीफॉस्फोरस अॅसिड असते. जे किडनीवर वाईट परिणाम करतात.


Show More

Related Articles

Back to top button