food

पदार्थ तळण्यासाठी वापरलेले तेल परत आहारा मध्ये वापरल्याने या गंभीर आजाराचा धोका होतो

आपण अनेक पदार्थ तळून करत असतो जसे पुऱ्या, भजी, वडे इत्यादी. हे पदार्थ तळल्या नंतर जे तेल उरते ते आपण तसेच ठेवतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी एखादा पदार्थ बनवण्यासाठी वापरतो. असे पुन्हा पुन्हा तेल वापरणे तुम्हाला आपण काहीतरी स्मार्ट करत आहोत अशी भावना देत असला तरी यामुळे तुमच्या आरोग्याची हेळसांड होते..

हे आहेत आरोग्यासाठी धोके

कॅन्सर होण्याचा धोका

स्वयंपाकात एकदा वापर केलेले तेल पुन्हा वापरणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे तुम्हाला कॅन्सरचा धोका वाढतो. पुन्हा पुन्हा तेल गरम करण्यामुळे त्याच्या मध्ये फ्री रॅडिकल्सची निर्मिती होते. यामध्ये असलेले अ‍ॅन्टीऑक्सिडंट तत्व कमी होतात. त्यामुळे शरीरा मध्ये कॅन्सरच्या सेल्सची निर्मिती होऊ होते. त्यामुळे एकदा पदार्थ तळण्यासाठी वापरात आणलेले तेल पुन्हा पदार्था मध्ये वापरल्याने आरोग्यास त्रास देणारे ठरते.

हृदयविकार

एकदा तळलेले तेल पुन्हा वापरल्यामुळे कॅन्सर होण्याच्या धोक्या सोबतच हृद्यविकाराचा धोकाही घेऊन येतो.यामुळे डायबेटीस आणि हृद्यविकाराची शक्यता वाढते.


Show More

Related Articles

Back to top button