Connect with us

गणपतीची मूर्ती घराच्या दरवाजावर लावू नका, अन्यथा पश्चात्ताप करावा लागेल

Astrology

गणपतीची मूर्ती घराच्या दरवाजावर लावू नका, अन्यथा पश्चात्ताप करावा लागेल

गणपती हे प्रथम पूज्य देव आहेत. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात यांच्याच पूजनाने केली जाते.  भगवान गणेशाची प्रथम पूजा केल्यामुळे कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होते असे मानले जाते. भगवान गणेशाची कृपा ज्याच्यावर असते त्याच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतात. त्याला आपल्या कार्यात यश मिळते.

परंतु कधीकधी कोणताही विचार न करता भगवान गणेशाची मूर्ती किंवा फोटो दरवाजाच्या वर लावला जातो. आज आम्ही या आर्टिकलच्या माध्यमातून गणपतीची मूर्ती किंवा फोटो कसे लावले पाहिजे हे सांगत आहोत.

चला पाहू या बद्दल

तुमच्या माहितीसाठी गणपतीच्या दोन मुर्त्या एका जागी नाही ठेवल्या पाहिजेत हे अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्र अनुसार यामुळे उर्जेचा एकमेकांमध्ये संघर्ष होतो जे अशुभ फळे देतात. जर एका पेक्षा जास्त गणेश मूर्ती असल्यास वेगवेगळ्या जागी ठेवणे योग्य राहील. कोणताही विचार न करता मुर्त्या इकडे तिकडे ठेवू नका.

गणपतीची मूर्ती किंवा फोटो अश्या स्थिती मध्ये ठेवू नका ज्यामध्ये ते बाहेरच्या दिशेला पाहत असतील भगवान गणेशाचे मुख हे नेहमी अश्या दिशेला पाहणारे असावे जे घराच्या दिशेने असेल.

जर मूर्ती किंवा फोटो बाहेर पाहतानाच्या दिशेने लावले तर ते चांगले मानले जात नाही जर अशी मूर्ती तुम्ही लावली असेल तर ठीक मागे एक मूर्ती लावा ज्यामुळे गणपतीची पाठ घराकडे होणार नाही. असे याकरिता कारण गणपतीच्या पाठीकडच्या भागात दुख आणि दरिद्रता यांचा वास मानला जातो.

जर आपण वास्तू विज्ञान अनुसार पाहिले तर घरात ठेवलेली गणेश मूर्ती खंडित, मोडलेली किंवा रंग उडालेली असल्यास त्वरित वाहत्या नदीमध्ये किंवा तलावात विसर्जन करावी आणि या एवजी नवीन मूर्ती स्थापित करावी. जर खंडित आणि बेरंग मूर्ती घरात ठेवली गेली तर सकारात्मक उर्जेचा संचार होत नाही आणि लाभ प्राप्त होत नाही.

भगवान गणेश हे विघ्नहर्ता मानले गेले आहेत त्यामुळे भगवान गणेशाची मूर्ती घरात ठेवताना तुम्हाला काही गोष्टीकडे नेहमी लक्ष ठेवले पाहिजे ज्यामुळे ते तुमच्या विघ्नकर्ता बनणार नाहीत.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top