Hyundai Exter वर नोव्हेंबरमध्ये मोठी सवलत; EX ते SX(O) व्हेरियंटचे डिटेल्स पहा

Hyundai Exter SUV वर नोव्हेंबर महिन्यात 70 हजार रुपयांपर्यंत सवलत जाहीर. EX ते SX(O) व्हेरियंटचे फीचर्स आणि इंजिन पर्याय जाणून घ्या.

Vinod Kamble
Hyundai Exter
Hyundai Exter वर नोव्हेंबरमध्ये मोठी सवलत

हुंडई मोटर इंडिया ने नोव्हेंबर महिन्यासाठी आपल्या एंट्री-लेव्हल Exter SUV वर मोठी सवलत जाहीर केली आहे. कंपनी या मॉडेलवर 70 हजार रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. ऑक्टोबरमध्ये या SUV वर 50 हजारांची सवलत होती, त्यामुळे यावेळी ग्राहकांना अतिरिक्त फायदा मिळणार आहे. कंपनीकडून रोख सवलत, एक्स्चेंज बोनस, स्क्रॅपेज फायदे, कॉर्पोरेट आणि अपग्रेड बोनस अशा विविध ऑफर्स देण्यात येत आहेत. Exter ची सध्याची एक्स-शोरूम किंमत 5,68,033 रुपये आहे.

- Advertisement -

Exter EX व्हेरियंटचे फीचर्स

Exter EX व्हेरियंटमध्ये 1.2 पेट्रोल MT इंजिन मिळते. सुरक्षेच्या दृष्टीने यात 6 एअरबॅग्स, ABS सह EBD, सेंट्रल लॉकिंग, की-लेस एंट्री आणि सर्व सीटसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट देण्यात आले आहेत. LED टेललॅम्प, बॉडी-कलर बंपर्स, 4.2-इंच MIDसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट पॉवर विंडोज, अ‍ॅडजस्टेबल रियर हेडरेस्ट, मॅन्युअल AC, ड्रायव्हर सीट हाइट अ‍ॅडजस्टमेंट, रियर पार्किंग सेन्सर्स मिळतात. EX (O) व्हेरियंटमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट आणि व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंटही मिळते.

Exter S व्हेरियंटचे फीचर्स

हा व्हेरियंट 1.2 पेट्रोल MT/AMT आणि 1.2 CNG MT इंजिन पर्यायांसह येतो. यात EX व्हेरियंटच्या सर्व सुविधांसह टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, 8-इंच टचस्क्रीन, Android Auto, Apple CarPlay, व्हॉइस रिकग्निशन, चार स्पीकर्स, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, रियर AC व्हेंट, रियर पॉवर विंडोज, इलेक्ट्रिकली अ‍ॅडजस्टेबल विंग मिरर्स, USB Type-C पोर्ट, रियर पार्सल ट्रे, डे-नाईट IRVM आणि 14-इंच स्टील व्हील कव्हर्स मिळतात. AMT व्हेरियंटमध्ये इलेक्ट्रिक फोल्डिंग मिरर्सही दिल्या आहेत.

- Advertisement -

Exter SX व्हेरियंटचे फीचर्स

SX व्हेरियंटमध्ये 1.2 पेट्रोल MT/AMT आणि 1.2 CNG MT इंजिन उपलब्ध आहे. यात S व्हेरियंटच्या सर्व सुविधांसह रियर पार्किंग कॅमेरा, रियर डिफॉगर, ISOFIX माउंट्स, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, 15-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, शार्क फिन अँटिना, सनरूफ, AMT मॉडेलमध्ये पॅडल शिफ्टर्स आणि पेट्रोल इंजिनमध्ये क्रूझ कंट्रोल या सुविधा मिळतात.

- Advertisement -

Exter SX (O) व्हेरियंटचे फीचर्स

या व्हेरियंटमध्ये 1.2 पेट्रोल MT/AMT इंजिन मिळते. SX व्हेरियंटवरील सर्व फीचर्ससह ऑटो हेडलॅम्प्स, फुटवेल लाईटिंग, स्मार्ट की, की-लेस गो, वायरलेस चार्जर, 15-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स, लेदर-रॅप्ड स्टीयरिंग आणि गिअर लीव्हर, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, रियर वायपर- वॉशर आणि लगेज लॅम्प अशा सुविधा मिळतात.

Exter SX (O) डॅशकॅम व्हेरियंटचे फीचर्स

या मॉडेलमध्ये SX (O) मधील सर्व फीचर्ससह डॅशकॅम, फ्रंट-रियर मडगार्ड्स, 8-इंच टचस्क्रीनसह BlueLink, नेचर साऊंड, Alexa द्वारे Home-Car लिंक आणि OTA अपडेट्सची सुविधा मिळते.

डिस्क्लेमर: दिलेली सवलत शहरानुसार आणि डीलरनुसार बदलू शकते. कार खरेदी करण्यापूर्वी आपल्या डीलरकडून सर्व तपशील तपासून घ्यावेत.

TAGGED:
My Name is Vinod Kamble, I Work as a Content Writer for MarathiGold and I like Writing Articles.