मुंबई: इलेक्ट्रिक व्हेईकलची (EV) क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. हे पाहता, बजाज ऑटो (Bajaj Auto) भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलरमध्ये आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी Pulsar Elan आणि Pulsar Eleganz ही नावे नोंदणीकृत केली होती, तर आता बजाज ब्लेड नावाचे पेटंट नोंदणीकृत केले आहे.

परंतु अशा नावाचे पेटंट घेतल्याने या नावाखाली केवळ इलेक्ट्रिक वाहन (EV) लाँच केले जाईल असे सुचवत नाही. याशिवाय, कंपनी इतक्या लवकर इलेक्ट्रिक लाइनअपमध्ये नवीन वाहने लॉन्च करू शकणार नाही. आतापर्यंत अशी कोणतीही बातमी आलेली नाही ज्यावरून हे स्पष्ट झाले आहे की कंपनी बजाज ब्लेड नावाने बाइक किंवा स्कूटर किंवा इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करेल.

कंपनी नवीन स्कूटर लाँच करणार आहे:

बजाज ऑटो (Bajaj Auto) कडून अद्याप कोणतीही बातमी नाही, परंतु कंपनी सतत इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये नवीन वाहने लॉन्च करण्याची तयारी दर्शवत आहे. अलीकडेच कंपनीने कोलकाता येथे चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग सुरू केले आहे.

यासह, कंपनीला आपल्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची देशभरात लवकरात लवकर विक्री वाढवायची आहे. चेतक इलेक्ट्रिक व्यतिरिक्त, बजाज आता लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर काही महिन्यांपूर्वी देशात चाचणीदरम्यान दिसली होती.

ब्लेड असेल नवीन 125cc बाईक?

बजाजने काही दिवसांपूर्वी चेतक ब्रँड अंतर्गत नवीन इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आणणार असल्याचे विधान केले होते. या विधानानंतर, ब्लेड ही इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाइक असण्याची शक्यता नगण्य बनते. एक शक्यता अशी असू शकते की कंपनी या नावाखाली एक नवीन परवडणारी कम्युटर बाइक लॉन्च करू शकते.

कंपनी परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये CT100 आणि Platina सारख्या बाइक्सची विक्री करत आहे. या दोन्ही बाइक्सची विक्री चांगली होत आहे. अशा परिस्थितीत, कंपनी नवीन बजाज ब्लेड नावाची 125cc बाईक लाँच करू शकते, कारण सध्या या सेगमेंटमध्ये फक्त पल्सरचीच विक्री केली जात आहे.