Connect with us

माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करतात या 6 वस्तू, घरामध्ये ठेवल्यामुळे कधी येत नाही पैश्यांची कमी

Dharmik

माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करतात या 6 वस्तू, घरामध्ये ठेवल्यामुळे कधी येत नाही पैश्यांची कमी

माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर आणि कुटुंबावर प्रत्येक हवीहवीशी असते. माता लक्ष्मीला खुश करण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात पूजा-अर्चना करतात. ज्योतिष आणि तंत्रशास्त्रामध्ये काही वस्तू अश्या सांगितलेल्या आहेत ज्यांना घरामध्ये ठेवल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. सांगितले जाते कि या वस्तू माता लक्ष्मीचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करतात. यासाठी आज आम्ही तुम्हाला 6 वस्तूंबद्दल माहिती सांगत आहोत ज्यांना घरामध्ये ठेवणे शुभ मानले जाते. यापैकी कोणतीही एक वस्तू आपल्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये धनाची कमी कधीही होणार नाही.

यापैकी कोणतीही एक वस्तू आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आर्थिक स्थिती सामान्य ठेवेल. या सहा वस्तू सिद्ध मानल्या जातात. यांना घरामध्ये ठेवल्याने इनकम आणि धन दोन्ही मध्ये वाढ होईल. जे लोक कर्जामध्ये बुडालेले आहेत त्यांना देखील फायदा होईल. एवढेच नाही, तर एखाद्या ठिकाणी फसलेले पैसे पुन्हा मिळण्यासाठी मदत होते. चला तर पाहू कोणत्या आहेत या सहा वस्तू ज्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात.

दक्षिणावर्ती शंख

दक्षिणावर्ती शंख देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. सोबतच यास धन-संपदा, ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे हा शंख घरामध्ये ठेवल्यामुळे तुमच्या सगळ्या समस्या दूर होण्यास सुरुवात होते. यास घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा.

पारद लक्ष्मी प्रतिमा

तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर घरामध्ये पारद लक्ष्मीची मूर्ती ठेवा. माता लक्ष्मीच्या पारद स्वरूपाच्या पूजेमुळे मनातील इच्छा पूर्ण होतात.

कवडी

असे मानले जाते कि घरामध्ये कवडी ठेवल्यामुळे घरामध्ये पैश्यांची कमी कधीही होत नाही. कवडी तुम्हाला वाईट नजर आणि संकटापासून वाचवते.

माता लक्ष्मीच्या चरण पादुका

माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी माता लक्ष्मीच्या चरण पादुका घरामध्ये ठेवा. एखाद्या विशेष उद्देशासाठी देखील तुम्ही यांना आपल्या घरामध्ये ठेवू शकता. पण लक्षात ठेवा या चरण पादुकांची दिशा पैसे किंवा ज्वेलरी ठेवलेल्या दिशेने असावी.

कुबेर प्रतिमा

भगवान कुबेर सुख-समृद्धी आणि धनाचे देवता मानले जातात. माता लक्ष्मीच्या सोबत जर तुम्ही कुबेर देवतेची पूजा केली तर पैश्याच्या संबंधित सगळ्या समस्या समाप्त होतील. घरामध्ये कुबेर देवतेची मूर्ती किंवा फोटो लावल्याने देवाची कृपा कुटुंबावर राहील.

श्री यंत्र

श्री यंत्र एक असे चमत्कारिक यंत्र मानले जाते कि हे घरामध्ये ठेवल्यामुळे तुमच्या सगळ्या प्रकारच्या समस्या पासून सुटका देण्याचे कार्य हे करते. या शुभ यंत्राने धन-समृद्धी, लाभ तसेच ऋण मुक्ती इत्यादी फायदे मिळतात.

Trending

Advertisement
To Top