Connect with us

धनाची देवी माता लक्ष्मी होते प्रसन्न, या 7 सवयी असलेल्या लोकांवर

Astrology

धनाची देवी माता लक्ष्मी होते प्रसन्न, या 7 सवयी असलेल्या लोकांवर

हिंदू धर्मातील विविध धार्मिक ग्रंथांमध्ये अश्या अनेक वस्तू बद्दल सांगितले गेले आहे की ज्या देवी-देवतांना अत्यंत प्रिय आहेत जर व्यक्ती देवीदेवतांची पूजा करताना या वस्तूंचा वापर करत असेल तर त्यावर देवी देवता आपली कृपा करतात. तसे पाहिले तर देवी देवता आपल्या भक्तांची भक्ती आणि कोणताही स्वार्थरहीत सेवेला पाहून खुश होतात आणि त्यांचा आशीर्वाद देतात. धनाची देवी माता लक्ष्मी चंचल स्वभावाची आहे आणि त्यांची कृपा मिळवणे सोप्पे नाही आहे. परंतु तरीही जर व्यक्तीच्या अंगी काही चांगल्या सवयी असल्यातर माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर लवकर प्रसन्न होते आणि त्यांचा कृपाशीर्वाद देते. आज आम्ही तुम्हाला व्यक्तीच्या अंगी त्या कोणत्या 7 सवयी असल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते हे सांगणार आहोत. या सवयी व्यक्तीच्या अंगी असतील तर माता लक्ष्मी त्यांच्यावर आनंदी असते.

चला पाहू  या 7 सवयी कोणत्या आहेत

पूजा करताना घंटी वाजवणे

तुमच्या माहितीसाठी जो व्यक्ती सकाळ आणि संध्याकाळ घरी पूजा करताना घंटी वाजवतो त्या व्यक्तीवर धनाची देवी माता लक्ष्मी खुश असते. असे मानले जाते कि ज्या घरामध्ये घंटीचा आवाज घराच्या प्रत्येक कोपऱ्या पर्यत पोहचतो तेथे माता लक्ष्मी वास करते.

गो मुत्र शिंपडण्याची सवय

घरामध्ये गो मुत्र शिंपडणे शुभ मानले जाते जर असे केले तर घरावर देवीदेवतांची कृपा राहते. जो व्यक्ती घरामध्ये दररोज गो मुत्र शिंपडतो त्याच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न राहते.

मंदिराची साफसफाई

जो व्यक्ती आपल्या घरामध्ये मंदिराची नियमित साफसफाई करतो. त्याच्यावर धनाची देवी माता लक्ष्मी कृपा करते.

घराच्या मंदिरातील प्रकाश

जो व्यक्ती आपल्या घरामध्ये मंदिराची स्थापना करताना यागोष्टीकडे लक्ष देतो की मंदिरापर्यंत सूर्यप्रकाश पोहचेल अश्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न असते. यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक उर्जा येते.

पश्चिमेकडे तोंड करून पूजा करणे

पश्चिम दिशेला तोंड करून पूजा करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे आणि रात्री झोपताना मंदिराचे दरवाजे आणि पडदे बंद केले पाहिजेत. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहते.

एकाक्ष नारळ

असे मानले जाते कि जो व्यक्ती नियमित पणे आपल्या घरामध्ये एकाक्षी नारळाची स्थापना करून पूजा करतो त्या व्यक्तीवर धनाची देवी माता लक्ष्मी कृपा करते. माता लक्ष्मीला एकाक्षी नारळ प्रिय आहे यासाठी मंदिरामध्ये एकाक्षी नारळाची स्थापना करून पूजा केली पाहिजे.

तुळशीच्या झाडाची देखभाल

जो व्यक्ती घराच्या छतावर तुळशीचे रोपटे लावतो आणि त्याची देखभाल करतो आणि त्याची पूजा करतो त्याच्यावर माता लक्ष्मी सोबतच भगवान विष्णू देखील आपली कृपा करतात. अश्या व्यक्तीला धनाची समस्या कधी येत नाही.

आमचे सर्व मनोरंजक आणि ज्ञानवर्धक आर्टिकल प्रसिद्ध होताच वाचण्यासाठी आमचे Android App खालील लिंक वरून त्वरित डाऊनलोड करा.

Marathi Gold Live

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top