astrology

इलायची चे हे अचूक तोडगे बदलून टाकेल तुमचे नशीब, मनोकामना पूर्ण करण्यासाठी आजच करून पहा

आपल्या स्वयंपाक घरामध्ये इलायची चा वापर मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो. लोकांना याचे आयुर्वेदिक आणि औषधी गुण चांगलेच माहीत आहेत. परंतु बहुतेक लोकांना याचे ज्योतिषशास्त्रीय फायदे माहीत नाहीत. होय, इलायचीचा वापर आपण मसाल्याचा पदार्थ म्हणून करतो तसाच वापर पूजा पाठ, तांत्रिक क्रिया आणि तोडगे करण्यासाठीही केला जातो. आज आम्ही तुम्हाला असाच एक इलायचीचा प्रभावी उपाय सांगत आहोत. जो उपाय केल्यामुळे तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतील. तर चला पाहूया इलायचीचे काही उपयोग.

काही लोकांच्या बाबतीत बऱ्याच वेळा असे होते की मेहनत करून देखील त्यांना त्या स्वरूपामध्ये यश प्राप्ती होत नाही. काम ते लोक करतात परंतु त्याचे श्रेय दुसऱ्याच व्यक्तीला मिळते. जर तुमच्यासोबत देखील असे वारंवार घडत असेल तर हिरव्या रंगाच्या स्वच्छ कपड्यांमध्ये एक इलायची बांधून तिला रात्री आपल्या उशी खाली ठेवावे आणि दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर कोणत्याही बाहेरील व्यक्तीस इलायची द्यावी. असे केल्यामुळे तुमचे बिघडलेले काम होण्यास सुरुवात होईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला यशप्राप्ती होईल.

जर तुमच्या भरपूर प्रयत्नांच्या नंतर देखील तुमच्याजवळ पैसे टिकत नसतील. तर तुम्ही आपल्या पर्समध्ये 5 इलायची ठेवाव्यात. असे केल्यामुळे तुमची पैशाच्या संबंधित समस्या दूर होतील आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग प्राप्त होतील.

जर तुम्ही सुंदर सुयोग्य जीवनसाथीच्या शोधामध्ये असाल तर एका पिवळ्या कपड्यांमध्ये 5 इलायची बांधाव्यात आणि ते एखाद्या गरीब व्यक्तीस दान करावे असे केल्यामुळे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल.

जर तुम्ही भरपूर मेहनत करून देखील परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळत नसेल तर यासाठी इलायचीला दुधामध्ये गरम करून एखाद्या गरीब व्यक्तीस लागोपाठ 7 सोमवार पिण्यास द्यावे. असे केल्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये मनासारखे यश मिळेल. हा उपाय मुलांसाठी त्यांचे आई-वडील देखील करू शकतात.

ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रह धन, भौतिक सुख सुविधा आणि विवाह संबन्धी सर्व परिस्थितीचा कारक मानला आहे. त्यामुळे जर आपला शुक्र बलवान असेल तर आपल्या जीवनामध्ये सुख सौभाग्य टिकून राहते आणि जर शुक्र कमजोर असेल तर आपले भाग्य आपली साथ देत नाही. जर तुमचा देखील शुक्र कमजोर असेल तर यामुळे जीवनामध्ये तुम्हाला सुख मिळू शकत नाही यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये दोन इलायची टाकाव्यात आणि त्यास उकळवावे. या पाण्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये एकत्र करून त्याने अंघोळ करावी. लक्षात ठेवा आंघोळ करताना खाली दिलेला पवित्र मंत्र जप करावा.

ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली

दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा

या उपायामुळे तुमचा शुक्र मजबूत होईल आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतील.

जर एखाद्या व्यक्तीच्या विवाहामध्ये विलंब होत असेल तर यासाठी शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी कोणत्याही मंदिरामध्ये दोन इलायची सोबत पाच प्रकारच्या मिठाई दान कराव्यात. सोबतच शुद्ध तुपाचा दिवा लावावा. हा उपाय स्त्रियांनी गुरुवारी आणि जर पुरुष असेल तर शुक्रवारी करावा.


Show More

Related Articles

Back to top button