Vastu Tips : आपल्या सर्वाना माहीत आहे प्रामुख चार दिशा आहेत, परंतु झोपण्यासाठी सर्व दिशा निवडणे योग्य नाही. वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीने दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोके ठेवून झोपावे, म्हणजेच नैसर्गिकरित्या आपले पाय उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवावे, परंतु कधीही उत्तर आणि पश्चिम दिशेने डोके ठेवून झोपू नये.
या सर्व दिशेला झोपणे आणि न झोपण्याची अनेक कारणे आहेत, ज्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सर्वप्रथम हे जाणून घ्या की दक्षिणेकडे डोके ठेवून झोपल्यास काय होते.
वास्तुशास्त्रात या दिशेला डोके ठेवून झोपणे चांगले मानले जाते. या दिशेला डोके ठेवून झोपल्याने आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो, म्हणजेच ही दिशा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे.