Unlucky Plants: घर सजवण्यासाठी लोक अनेक वेळा आपल्या घरात अशी काही झाडे लावतात, ज्याचा आपल्याला नंतर पश्चाताप होतो. वास्तूमध्ये अशा काही झाडांचा आणि वनस्पतींचा उल्लेख करण्यात आला आहे, जे कुटुंबातील सुख-शांती दूर करतात.
घर आणि बागेत कोणती झाडे लावावीत, हे वास्तुशास्त्रात अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. मात्र, नकळत आणि समजून न घेता ही रोपे लावल्याने आपल्याला खूप त्रास होऊ शकतो. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुमच्या घरात कोणती झाडे लावू नयेत.
काटेरी झाडे
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काटेरी झाडे लावू नयेत. घरामध्ये कॅक्टस, हॉथॉर्न सारख्या वनस्पती लावण्यास मनाई आहे. असे मानले जाते की ही झाडे लावल्याने घरातील सुख-शांती नष्ट होते.
मेहंदीचे रोप
काही लोक छंद म्हणून आपल्या घरात मेहंदीचे रोप लावतात. पण या वनस्पतीची लागवड करणे वास्तुशास्त्रात अशुभ मानले गेले आहे. असे मानले जाते की हे रोप घरामध्ये लावल्याने झाडाच्या वाढीसोबत नकारात्मक शक्तीही वाढते. त्याचा वाईट परिणाम घरातील सदस्यांवर दिसून येतो.
पिंपळाचे झाड
वास्तूनुसार घरात चुकूनही पिपळाचे झाड लावू नये. ज्योतिष शास्त्रानुसार घरात पिंपळाचे झाड असल्यास धनहानी होते. ही वनस्पती नकारात्मक ऊर्जा निर्माण करते.