ज्योतिष शास्त्रा मध्ये काही छोटेछोटे उपाय सांगितले आहेत जे तुमचे मोठे प्रॉब्लेम सोडवू शकतात. हे ज्योतिष उपाय करण्यासाठी घरातील दररोजच्या वापरातील वस्तू वापरण्यात आलेल्या आहेत.
हे छोटे ज्योतिषीय उपाय प्रभावी असल्याचे मानले गेले आहे. जीवनातील काही गोष्टींचे प्रतिनिधित्व काही ग्रहांकडे आहे म्हणजेच एखाद्या ठराविक गोष्टीचा कारक एखादा ग्रह मानला जातो आणि त्याच्या संबंधित काही वस्तू असतात.
गूळ आपल्या स्वयंपाकघरात असलेला पदार्थ आहे. त्याचा वापर आपण नियमित करतो. परंतु आज येथे जो उपाय सांगत आहोत त्यासाठी गूळ लागणार आहे. गूळ वापरून आपण आपल्या कोणत्या इच्छा पूर्ण करण्यासाठी उपाय करू शकतो ते पुढे पाहू.
जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात किंवा नवीन नोकरी पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्या घरात बनलेल्या पहिल्या पोळी किंवा भाकरी सोबत गूळ घ्या आणि ते गायीला खाण्यास द्या. असे केल्याने तुम्हाला नोकरीची चांगली संधी चालून येईल.
कुंडली मध्ये सूर्य कमजोर असेल तर दररोज सकाळी दिवसाची सुरुवात गूळ खाऊन केली पाहिजे. याच सोबत रविवार पासून सुरुवात करून 8 दिवस दररोज 800 ग्राम गहू आणि 800 ग्राम गूळ मंदिरात दान दिले पाहिजे.
जर एखाद्याचा विवाह जमण्यास समस्या निर्माण होत असेल तर त्याने गुरुवार च्या दिवशी पिठाच्या कणके मध्ये थोडेसे गूळ, तूप आणि हळद एकत्र करून गायीला खाण्यास दिले पाहिजे. हा उपाय लागोपाठ 7 दिवस केला पाहिजे. यामुळे लवकरच विवाह योग बनेल.