Sun Transit 2023 in Marathi : ज्योतिषशास्त्रात (Astrology) सूर्य हा यश, आरोग्य, आत्मविश्वासाचा कारक मानला जातो. यासोबतच सूर्य हा ग्रहांचा राजा आहे आणि दर महिन्याला आपली राशी बदलतो. यावेळी सूर्य 15 मार्चला मीन राशीत प्रवेश केला असून 14 एप्रिलपर्यंत या राशीत राहील. या दरम्यान काही राशी खूप शुभ परिणाम देतील. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी पुढील दिवस शुभ राहतील.
सूर्य या राशीच्या लोकांना अपार संपत्ती आणि यश देईल
वृषभ-
वृषभ राशीच्या लोकांना सूर्याच्या गोचरमुळे खूप फायदा होईल. आर्थिक प्रगती होईल, ज्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील. करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकते. उच्च पद, प्रतिष्ठा मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मिथुन-
सूर्य गोचर मिथुन राशीच्या लोकांना मान-सन्मान देईल. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.
कर्क-
कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्याचे गोचर खूप फायदेशीर आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, तुमच्या कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी आणि बिझनेस दोन्हीसाठी वेळ उत्तम आहे.
तूळ-
सूर्याच्या राशी बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना मोठा विजय मिळेल. तुमच्या शत्रूंचा पराभव होईल. करिअरमध्ये प्रगती होईल. उत्पन्न वाढेल. या लोकांसाठी 14 एप्रिलपर्यंतचा काळ चांगला आहे.
वृश्चिक-
सूर्याचे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी व्यवसायात भरघोस नफा मिळवून देईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नशिबाची साथ मिळेल.
धनु-
14 एप्रिलपर्यंत सूर्य जीवनात आनंद देईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. उत्पन्न वाढेल. मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे.