तेजस्वी सूर्य 14 जानेवारी रोजी मकर राशीत प्रवेश करणार आहेत, मकर ही शनि देवाची राशी आहे. सूर्याला धैर्य, आत्मा, पराक्रम आणि आरोग्य इत्यादीचा कारक मानले गेले आहेत. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात. 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, तेव्हा या दिवशी भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल.
सूर्य हे शनिदेवाचे पिता आहेत, तरीही त्यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे. दोन शत्रू म्हणजेच शनि आणि सूर्य एकाच राशी प्रवेश केल्याने अनेक राशींवर प्रभाव होईल.
सूर्य वर्षातून एकदा आपला पुत्र शनीच्या राशीत प्रवेश करतो आणि महिनाभर त्याच राशीत राहतो. जाणून घ्या सूर्य पुत्र शनीच्या राशीत गेल्याने कोणत्या राशींना फायदा होणार आहे.
वृषभ – सूर्य राशी बदलून मकर राशीत गेल्याने वृषभ राशीच्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरेल. या काळात वृषभ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ लाभल्यामुळे काही कामे होतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक प्रगती होईल.
मिथुन – मकर राशीत सूर्य प्रवेश केल्यामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. तुमचे करिअर आणि व्यवसाय महिनाभर चांगला राहील. आरोग्याशी संबंधित समस्याही दूर होतील. आर्थिक आघाडीवर प्रगती होईल. मानसिक तणाव कमी होईल.
कर्क – शनीच्या राशीत सूर्य राशी परिवर्तन करून येण्यामुळे कर्क राशीसाठी हे शुभ राहील. या काळात अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. धार्मिक प्रवासाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अचानक धनलाभ होत आहे.
मकर – सूर्या मकर राशीत येत आहे, अशा स्थितीत मकर राशीच्या लोकांसाठी मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. जुन्या आरोग्याच्या कुरबुरी दूर होतील. व्यावसायिक आणि नोकरीतील प्रगतीचा मार्ग खुला होईल.