कुंभ राशीचे स्वामी शनी आहेत. ते स्वतः जवळपास 30 वर्षांनंतर कुंभ राशीत 17 जानेवारी रोजी प्रवेश करणार आहे यामुळे निर्माण होणारा राजयोग मेष, वृषभ, कन्या, मकर आणि कुंभ या राशीला फायदा देणार आहे.
शनि मकर राशी परिवर्तन कोणत्या राशीला काय लाभ देणार चला जाणून घेऊ
मेष – मेष राशीच्या अकराव्या भावात शनिचे गोचर होत आहे. या प्रभावामुळे तुम्ही भाग्यवान होऊ शकता. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतील.
वृषभ – वृषभ राशीच्या दहाव्या भावात शनिचे भ्रमण होईल. या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. या दरम्यान तुम्हाला भाग्य साथ देईल. बरेच दिवस रखडलेल काम पूर्ण होऊ शकते. शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे. शनि आणि शुक्र यांच्यात मैत्रीची भावना असल्यामुळे तुम्हाला फायदा होईल.
कन्या – कन्या राशीच्या सहाव्या भावात शनिचे गोचर 17 जानेवारी पासून होईल. यामुळे तयार झालेला षष्ठ महापुरुष योग तुम्हाला लाभदायक ठरेल. या दरम्यान तुम्हाला शत्रूंवर विजय मिळेल. जुन्या आजारांपासून मुक्ती मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत नवीन संधी मिळतील.
मकर – तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावात शनिचे भ्रमण होईल.शनि गोचरमुळे निर्माण होणारा शश महापुरुष राजयोग तुमच्या खर्चाला आळा घालेल. उत्पन्नात वाढ करण्याची संधी मिळेल. पैशाची आवक वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. नशिबाची साथ लाभेल.
कुंभ – नशिब तुम्हाला साथ देईल. आरोग्याच्या बाबत काही चिंता असल्यास त्या दूर होण्यास मदत होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. व्यवसायात फायदा होईल.