Shani Gochar in Aquarius 2023: शनि हा ग्रह प्रत्येक राशीसाठी महत्वाचा आहे. शनि राशी परिवर्तनाचा सर्व राशीवर चांगला किंवा वाईट प्रभाव होतो. 2023 वर्षात शनीच्या दशेत मोठा बदल होणार आहे.
पंचांगानुसार 17 जानेवारी 2023 रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करणार. शनीच्या या राशी बदलामुळे या राशीचे लोक नवीन वर्षात श्रीमंत होतील.
17 जानेवारीला जेव्हा ते कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा मीन राशीच्या साडे सातीचा पहिला चरण सुरू होईल आणि कर्क आणि वृश्चिक राशीला शनी धैय्या सुरू होईल.
चला तर जाणून घेऊया कुंभ राशीत शनीच्या प्रवेशाने कोणत्या राशींचे भाग्य उजळेल.
वृषभ : वृषभ राशीच्या तुमच्या कामात अडथळे येत होते ते आता शनि गोचरच्या प्रभावापासून दूर होतील. मोठे पद आणि पैसा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत बदल संभवतो. हे वर्ष करिअर आणि लव्ह लाईफमध्ये यशस्वी होईल. विवाह होण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन : कुंभ राशीत शनीचे गोचर मिथुन राशीतील शनि ढैय्या प्रभाव संपवेल. त्यांना तणावातून दिलासा मिळेल. करिअरमध्ये चांगला काळ सुरू होईल.
तूळ : 17 जानेवारीला तूळ राशीच्या लोकांना शनीच्या ढैय्यातून मुक्ती मिळेल. त्यांचे थांबलेले काम आता सुरू होणार आहे. तणाव कमी होईल. मानसिक सुख-शांती मिळेल. पैसा आणि करिअरच्या क्षेत्रात यश मिळेल.
धनु : धनु राशीच्या लोकांना प्रदीर्घ काळानंतर शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. त्यांचे दुःख संपेल. आर्थिक प्रगती होईल. मानसिक तणाव आणि रोगापासून मुक्ती मिळेल. भाग्य तुमच्या सोबत राहील.