३१ दिवस शनी अस्त: ‘या’ ५ राशींसाठी मिश्र फलदायी; अखंड सावध राहावे, चढ-उतारांचा काळ!

शनीचा अस्त म्हणजे काय असत? कोणत्या राशींसाठी काळ संमिश्र ठरू शकतो? या काळात काय करू नये? जाणून घ्या…

जानेवारी महिना ज्योतिषशास्त्राच्या (Astrology) दृष्टिने महत्वाचा राहिल्याचे सांगितले जात आहे. या महिन्यात बुध, मंगळ यांच्या स्थिती मध्ये बदल झाले. तसेच शुक्र, शनी यांचे राशीपरिवर्तन म्हणजेच राशी गोचर झाले.

यातच १७ जानेवारी रोजी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केलेला शनी अवघ्या १८ दिवसांनी म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसातच अस्तंगत होत आहे. (shani asta in kumbha rashi 2023)

४ फेब्रुवारी २०२३ रोजी शनी कुंभ राशीत अस्त होणार आहे. शनीचा अस्त सुमारे महिनाभर राहणार आहे. ०६ मार्च रोजी अस्त झालेला शनीचा कुंभ राशीत उदय होणार आहे. एखादा ग्रह अस्त किंवा अस्तंगत होणे म्हणजे नेमके काय? ते समजून घेऊ… (shani asta 2023)

एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर येतो तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाची ही स्थिती बनते, तेव्हा त्याला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत झाला असे म्हटले जाते. तसेच हाच ग्रह सूर्यापासून लांबच्या अंशांवर जातो, त्यावेळी तो पृथ्वीवरून पुन्हा दिसू लागतो. ग्रह पुन्हा दिसू लागल्यामुळे त्या ग्रहाचा उदय झाला, असे समजले जाते.

👇👇👇👇👇

‘या’ ५ राशींसाठी मिश्र फलदायी; अखंड सावध राहावे, चढ-उतारांचा काळ

यानुसार, आताच्या घडीला सूर्य मकर राशीत आहे आणि फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि शनी एकमेकांपासून अगदी जवळच्या अंशांवर असतील.

सूर्याच्या प्रभावामुळे शनी पृथ्वीवरून दिसणार नाही. तसेच मार्च महिन्याच्या सुरुवातीला शनी सूर्यापासून लांबच्या अंशांवर जाईल. त्यामुळे ४ फेब्रुवारी २०२३ ते ०६ मार्च या कालावधीत शनी अस्तंगत राहील.

मूलत्रिकोणातील कुंभ राशीत प्रवेश केल्यानंतर लगेचच शनीचे अस्त होणे विशेष मानले जात आहे. शनीचे अस्तंगत होणे काही राशींना लाभदायक ठरू शकेल.

👇👇👇👇👇

‘या’ ५ राशींसाठी मिश्र फलदायी; अखंड सावध राहावे, चढ-उतारांचा काळ

तर काही राशींना या कालावधीत समस्यांचा, अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींना शनीचा अस्त संमिश्र ठरू शकेल? जाणून घेऊ…

Follow us on

Sharing Is Caring: