Shani Asta 2023: ज्योतिष शास्त्रानुसार 17 जानेवारी 2023 रोजी शनी गोचर झाले आणि आता 31 जानेवारी 2023 रोजी शनी कुंभ राशीमध्ये अस्त होत आहे. ही परिस्थिती काही राशीच्या लोकांसाठी कष्टदायक असू शकते, त्यामुळे त्यांनी अशा गोष्टी करू नयेत ज्यामुळे शनिदेव नाराज होतात.
अशा गोष्टी करणे बंद करा किंवा शनिदेवाला नाराज करणाऱ्या सवयींपासून दूर राहा. चला जाणून घेऊ कोणती कामे किंवा सवयी ज्यामुळे शनिदेव नाराज होतात.
जमिनीला पाय घासत कधीही चालू नका. असे करणाऱ्यांना शनि नेहमी त्रास देतो. यामुळे या लोकांना त्यांच्या कृतीचे अशुभ फळ मिळते. नेहमीचपैश्यांची तंगी राहते. जीवनात अनेक प्रकारचे गोंधळ असतात. त्याचप्रमाणे बसूनही पाय हलवू नयेत. असे केल्यानेही शनि अनेक प्रकारच्या मानसिक समस्या आणि तणाव देतो.
जे व्याजावर पैसे देतात, त्यांना शनि कधीही सोडत नाही. शनि कधी कधी या लोकांवर वाकडी नजर टाकतो आणि मोठी हानी करतो.
अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि अस्वच्छतेत राहणाऱ्यांना शनि कधीही आशीर्वाद देत नाही. अशा लोकांना शनि नेहमी रोग, त्रास, आर्थिक विवंचना आणि अपयश देतो. अशा लोकांना मेहनत करूनही फळ मिळत नाही. त्यामुळे नेहमी स्वच्छ रहा.
जे लोक बाथरूमला घाण ठेवतात. जे लोक रात्रभर स्वयंपाकघरात किंवा घरात कुठेही खरकटी भांडी टाकतात, त्यांना केवळ शनिच नव्हे तर राहूचाही प्रकोप सहन करावा लागतो. अशा लोकांना त्यांच्या कामात अपयश येते. कष्टाचे पूर्ण फळ मिळत नाही.