Shani Dev: आपल्या राशीवर शनीचा प्रभाव असतो. शनी हे कर्मफलदाता देव आहेत. शनि ग्रहांचे 17 जानेवारी रोजी राशी परिवर्तन होणार आहे. त्याच सोबत शश राजयोग निर्मित झाला आहे. शनी बद्दल तिसरी गोष्ट म्हणजे 21 जानेवारी रोजी शनी अमावस्या आहे.
यामुळे शनि देवाची कृपा मिळवण्यासाठी विविध राशीकडे सुवर्णसंधी आहे. ज्यांच्या कुंडलीत पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या भावात शनि असतो, त्यांच्या कुंडलीत एक शुभ योग तयार होतो जो पंच महापुरुष योगात समाविष्ट आहे. या योगास ‘शश’ योग म्हणतात.
शनि अमावस्येच्या दिवशी धनु, कुंभ, तुला, वृश्चिक राशीच्या लोकांनी पिंपळाच्या झाडाखाली पाणी, दूध, काळे तीळ आणि मिठाई अर्पण केले पाहिजे. ज्यांच्या कुंडलीमध्ये महादशा, अंतरदशा, साडेसाती किंवा शनीची धैय्या असतील त्यांच्या जन्मपत्रिकेनुसार त्यांना हे उपाय मदत करू शकतात.
याद्वारे शनिदेव प्रसन्न होऊ शकतात.याशिवाय शनि अमावस्येपासून सुरू होऊन हा उपाय सतत ४३ दिवस केल्याने शनीच्या दोषांपासून आराम मिळतो. यासाठी शनि अमावस्येपासून दररोज ४३ दिवस सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.
शनीला न्यायप्रिय देवता म्हणतात. म्हणूनच शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सत्कर्म करा, गरीब, दुर्बल, रुग्णांना शक्य तितकी मदत करा. धनु, कुंभ, तुला, वृश्चिक राशीच्या लोकांनी आवर्जून हे उपाय केले पाहिजेत.