Rahu Gochar 2023 in Pisces: ज्योतिष शास्त्रात (Astrology) राहू-केतू हे छाया ग्रह मानले गेले असले तरी ते अतिशय प्रभावी परिणाम करणारे मानले गेले आहेत. ठराविक काळा नंतर प्रत्येक ग्रह आपली राशी बदलतो.
2023 मध्ये बुध, शुक्र आणि सूर्य आपली राशी बदलणार आहेत.त्याच प्रमाणे राहू गोचर होणार आहे. 23 Octomber 2023 रोजी दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी राहूचे गोचर होणार आहे. राहू मेष राशी मधून मीन राशीत जाईल.
राहू नेहमी वक्री चाल चालतो. म्हणजेच उलट दिशेने जातो. चला जाणून घेऊ राहू गोचर झाल्याने कोणत्या राशीला लाभ होईल.
मेष : मेष राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात सकारत्मक बदल दिसून येतील. या काळात धन प्राप्तीचे नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. चांगली धन प्राप्ती होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरी मध्ये पगारवाढ किंवा दुसऱ्या चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते. बॉस तुमच्या कामाची प्रशंसा करेल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल.
कर्क : नवीन वर्षात ऑक्टॉबर महिन्या पासून तुम्हाला राहू लाभ देण्यास सुरुवात करेल. तुम्ही या काळात नवीन वास्तू किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला शुभ वार्ता मिळतील. नोकरी मध्ये लाभदायक पद मिळू शकते.
मीन : मीन राशीच्या लोकांसाठी राहू गोचर फायद्याचे ठरेल. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्या सोबतच करियर मध्ये प्रगती होईल. कुटुंबा मध्ये आनंदाचे वातावरण राहील. एखाद्या ठिकाणी दीर्घकाळापासून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात.