Rahu Gochar 2023: मायावी छाया ग्रह राहूचा थेट मानवी जीवनावर परिणाम होतो असे ज्योतिष शास्त्रात (Astrology) मानले जाते. राहू राशी परिवर्तन (Rahu Gochar) काही राशीच्या लोकांचे जीवन बदलते आणि काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
राहू गोचर 2023: वर्ष 2023 सुरू होण्यासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्षात अनेक ग्रह आणि राशींच्या चालींमध्ये बदल होतील.
2023 मध्ये शनी, गुरु आणि राहू-केतू यांसारख्या अनेक ग्रहांच्या राशीत बदल होणार आहेत. ज्योतिषशास्त्रात राहू-केतूला सावली ग्रह म्हणजेच छाया ग्रह मानले गेले आहे. ज्योतिषीय गणनेनुसार राहू-केतू कुंडलीत शुभ स्थानात असताना राशीला उच्च स्थान प्राप्त होते. जाणून घेऊ नवीन वर्षात कोणत्या राशीसाठी राहु गोचर लाभदायक ठरेल. Rahu rashi parivartan 2023 these zodiac signs will get tremendous benefit.
वृषभ : राहू राशी बदल या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर होणार आहे. तुमच्या राशीच्या अकराव्या भावात राहूचे गोचर होत आहे. या गोचर काळात तुम्हाला मित्राचे सहकार्य मिळेल. या काळात तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढ होईल. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो.
तूळ : राहु राशी बदलामुळे तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम मिळतील. राहूचे गोचर तुमच्या राशीच्या सहाव्या भावात असेल. या काळात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. तुम्हाला मोठ्या नोकरीची ऑफर येऊ शकते. राहु गोचर तुम्हाला यश देईल. प्रवासाचे योग जुळून येतील.
मकर : मकर राशीच्या लोकांसाठी राहुचे गोचर तिसऱ्या भावात राहील. प्रवासात भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल. तुमचे पराक्रम आणि धैर्य वाढेल. व्यापाऱ्यांना फायदा होईल. मन प्रसन्न राहील. जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
Rahu transit will give tremendous benefit to 3 zodiac signs