Rahu Gochar 2023 : वर्ष 2023 मध्ये अनेक मोठ्या ग्रहांचे गोचर झाले आहे आणि येत्या काळात अनेक ग्रह राशी बदलतील. येत्या काही महिन्यांत राहू देखील आपली राशी बदलणार आहे. तो सुमारे 18 महिन्यांनंतर राशी बदलेल. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) या वर्षी 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता मेष राशीतून बाहेर पडल्यानंतर राहु मीन राशीत प्रवेश करेल.
राहू हा अशुभ आणि पापी ग्रह मानला जातो. जर तो एखाद्याच्या कुंडलीत अशुभ स्थितीत असेल तर त्या राशीच्या लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु, शुभ स्थितीत, त्यांच्या प्रभावामुळे, लोकांची देखील चांदी होते. अशा परिस्थितीत राहु गोचरमुळे कोणत्या राशींना फायदा होईल हे जाणून घेऊया.
मेष-
राहुचे मेष मधून मीन राशीत होणारे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या दरम्यान शुभ वार्ता आणि फळे मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार झाल्यामुळे मोठा आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कर्क-
ज्योतिष शास्त्रानुसार राहूचे हे गोचर कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ फळ देईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. या दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली कामेही पूर्ण होतील.
मीन-
राहू मेष सोडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत मीन राशीच्या लोकांसाठी हा बदल शुभ ठरेल. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. कौटुंबिक आणि कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होईल.