Budh Gochar 2023: बुध ग्रह सध्या अस्त पावले आहेत. बुध 2 जानेवारी रोजी धनु राशीमध्ये अस्त झाले होते आणि त्यांचा उदय 13 जानेवारी रोजी होणार आहे. ज्याचा काही राशीच्या वर अशुभ प्रभाव पडणार आहे.
जानेवारी 2023 मध्ये अनेक ग्रह आपली स्थित बदलणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचे राशीपरिवर्तन महत्वाचे मानले जाते. कारण ग्रहांच्या राशी बदलाचा प्रभाव सर्व 12 राशीच्या लोकांवर पडतो.
चला जाणून घेऊ बुध 13 जानेवारी रोजी उदय झाल्यामुळे कोणत्या राशीच्या अडचणी मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी : या राशीच्या लोकांना आर्थिक व्यवहारात सावधान राहण्याची गरज आहे. वृषभ राशीच्या लोकांनी आर्थिक व्यवहारात बेसावध राहिल्यास नुकसान होऊ शकते. त्याच सोबत आपण आरोग्याच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे.
कर्क राशी : कर्क राशीच्या लोकांना या काळात काही अडचणी येऊ शकतात. करियर आणि व्यापारात काही आव्हान समोर उभे राहू शकते. पैस्याचं व्यवहार काळजीपूर्वक करावा. आरोग्याची काळजी ग्यावी.
तुला राशी : नोकरी मध्ये बदलाची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी नाराज राहण्याची शक्यता. कामात अडथळे येऊ शकतात. नवीन गुंतवणूक करण्याचा विचार सध्या टाळावा.