Mangal Margi 2023 in Taurus: राशीचे राशी भविष्य पाहताना मंगळ ग्रह विवाह, भूमि, साहस, पराक्रम, संपत्ति यांचा कारक ग्रह म्हणून पाहिला जातो. लग्न जमवण्याच्या वेळी देखील मंगळाची स्थिती महत्वाची असते. जर राशी कुंडली मध्ये मंगळ ग्रहांची स्थिती चांगली नसेल तर व्यक्ती क्रोधी आणि अहंकारी होतो.
सध्या मंगळ ग्रह वृषभ राशी मध्ये आहेत आणि ते वक्री चाल चालत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 13 जानेवारी 2023 रोजी मंगळ वृषभ राशीतून मार्गी होतील. ज्यामुळे तीन राशीवर त्याचा शुभ प्रभाव होईल. खालील तीन राशी 2023 साली मंगळाचा शुभ प्रभाव प्राप्त करतील.
मेष : मेष राशीच्या जातकांसाठी मंगळ लाभदायक सिद्ध होऊ शकतो. या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे पुन्हा मिळू शकतात. उत्पन्नात देखील वाढ होऊ शकते. आर्थिक स्थिती मधील मजबुती तुम्हाला दिलासा देईल. अध्यापन, मार्केटिंग, मीडिया इत्यादी भाषणाशी संबंधित क्षेत्रात सक्रिय असलेल्या अशा लोकांना त्यांच्या करिअरमध्ये लाभ मिळू शकतो.
सिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचे मार्गी होणे शुभ राहील. या लोकांना करिअर क्षेत्रात जास्तीत जास्त फायदा होईल. नोकरी-व्यवसायात यश प्राप्त होईल. उत्पन्न वाढेल आणि प्रगती होईल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. सध्याच्या नोकरीत तुम्हाला बढती मिळू शकते. जबाबदाऱ्या वाढतील आणि तुम्ही त्या आनंदाने पूर्ण कराल.
कन्या : कन्या राशीच्या लोकांना मंगळ मार्गी होणे लाभदायक राहील. नशीब या लोकांना साथ देऊ लागेल. आतापर्यंत रखडलेली कामे आता मार्गी लागतील. तुमच्या कामात यश मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. एखादी महत्त्वाची योजना पूर्ण होऊ शकते. परदेशी सहलीला किंवा लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
मित्रांनो 2023 च्या सुरुवातीला मंगळ मार्गी होत असल्याने मेष, सिंह आणि कन्या राशी च्या लोकांना याचा भरपूर फायदा होईल.