मकर संक्रांतीचा हा सण स्नान आणि दानाचा आहे.या दिवशी लोक नद्यांमध्ये स्नान करतात.ते आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा करतात.मकर संक्रांतीचा सण तिळाशिवाय अपूर्ण आहे.तिळाच्या पदार्थांबरोबरच दही-चुडा, गूळ, तीळ असे पदार्थ खातात.यासोबतच खिचडीचीही परंपरा आहे.या सणानिमित्त सर्वजण एकमेकांचे अभिनंदन करतात आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात.इथे आम्ही तुमच्यासाठी मकर संक्रांतीच्या या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.
तिळात मिसळला गुळ त्याचा केला लाडू…
मधुर नात्यांसाठी गोड गोड बोलू…!
संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा…!
Happy Makar sankranti 2023
हलव्याचे दागिने, काळी साडी…
अखंड राहो तुमची जोडी हीच शुभेच्छा, संक्रात वर्ष दिनी…!
Happy Makar sankranti 2023
दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे,
भोगीच्या व मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा…!
Happy Makar sankranti 2023
फक्त सणाला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण सनापुर ते गोड न राहता आयुष्यभर गोड राहू या..
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
Happy Makar sankranti 2023
आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे,
फुलाचे गीत ऐकावे असे कान नाहीत माझे,
चंद्र सूर्याला साठवून ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे हृदय आहे माझे.
तिळगुळ घ्या गोड बोला.
Happy Makar sankranti 2023
बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा दुःखाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
Happy Makar sankranti 2023