Ketu Gochar 2023: नवीन वर्ष 2023 बद्दल सर्वांना उत्सुकता निर्माण झाली आहे. नवीन वर्षाचे आपल्या राशीचे राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आतुरता वाढत चालली आहे. कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक ग्रह आपली राशी बदलणार आहेत ज्याचा परिणाम सर्व 12 राशींवर पाहण्यास मिळेल.
नवीन वर्षात केतू राशी बदलणार आहे. केतूला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी जवळपास 18 महिने कालावधी लागतात.
सध्या केतू कन्या राशीत गोचर करत आहे, पण ऑक्टोबर 2023 मध्ये केतू तूळ राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे काही राशींना फायदा होईल तर काही राशींना नुकसान होईल. चला जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत ज्यांची आर्थिक स्थिती चांगली राहील.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. तब्येतही सुधारेल. जर तुम्ही लांबच्या प्रवासाची योजना आखत असाल तर तुम्हाला त्यातही यश मिळेल.
करिअरच्या क्षेत्रात योजना यशस्वी होतील. आर्थिक लाभ होईल. जुनी रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील. या वेळी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला आहे. भागीदारीतून लाभ होण्याचीही शक्यता आहे.
सिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी काळ खूप फायदेशीर सिद्ध होईल. कुटुंबात शांतता राहील. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील. समाजात मान-सन्मान वाढेल.
प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात मेहनत केल्यास यश मिळेल.
धनु : केतूचे गोचर धनु राशीच्या लोकांच्या करिअरसाठी उत्कृष्ट ठरेल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. या काळात धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. कोर्ट केसेसमध्ये यश मिळू शकते. जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल. व्यवसायात भरघोस नफा होऊ शकतो.
मकर : मकर राशीचे लोक एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून चांगली कमाई करू शकाल. आर्थिक विकास होईल. मित्रांसोबत संबंध चांगले राहतील. नोकरीच्या ठिकाणी कोणतीही मोठी उपलब्धी या काळात मिळू शकते.
संपत्ती जमा करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. यासोबतच नवीन व्यवसायातून नफा मिळण्याची शक्यता आहे.
अश्या प्रकारे केतू गोचर वृषभ, सिंह, धनु आणि मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायक राहील.