Happy New Year Wishes: नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी सुंदर एसएमएस

Happy New Year Wishes: नवीन वर्ष सर्वाना महत्वाचे आहे आणि त्याची सुरुवात देखील तेवढ्याच आनंदाने उत्साहाने झाली आहे. 2023 हे नूतन वर्ष आज पासून सुरु झाले आहे. आज रविवार असल्यामुळे त्याचा आनंद दुप्पट झालेला आहे.

नवीन वर्षांचा पहिला दिवस रविवार असल्याने याचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जात आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे एसएमएस किंवा हॉट्सअप संदेश तुम्हाला आलेले असतीलच. तुम्ही देखील येथे दिलेले एसएमएस किंवा हॉट्सअप संदेश वापरून आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता.

शिखरे यशाची सर तुम्ही करावी.
पाहता वळूनी मागे शुभेच्छा माझी स्मरावी.
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे.
आयुष्यात तुमच्या सर्व काही मना सारखे घडू दे.
Happy New Year 2023

नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा स्पर्श.
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष.
हर्षाने होऊ दे हे जीवन आपले सुखी.
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

पाहता पाहता दिवस निघून जातील.
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील.
आशा मागील दिवसांची करु नको.
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
Happy New Year 2023

उद्या करायचं ते आज करा.
आज करायचं ते आत्ता आधी,
जर नेटवर्क होईल बिझी
मग विश कराल कधी?
Happy New Year 2023

उधाण येवो सत्कार्याला,
फूटो यशाची पालवी.
पूर्ण होवो तुमच्या इच्छा,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

Follow us on

Sharing Is Caring: