Happy New Year 2023 Wishes: नवीन वर्षाचे बेस्ट मैसेज वापरून द्या सर्वाना शुभेच्छा

Happy New Year 2023 Wishes and Quotes in Marathi: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सर्व एकमेकांना शुभेच्छा संदेश पाठवून नवीन वर्ष चांगले जाण्याची इच्छा बोलून दाखवतो.

आज 2023 चा पहिला दिवस आहे त्यामुळे नेहमी प्रमाणे Happy New Year चे मैसेज तुम्हाला आलेले असतील आणि तुम्ही देखील इतरांना शुभेच्छा देण्यासाठी इच्छुक असाल. खालील निवडक नवीन वर्षाचे बेस्ट मेसेज पाठवून तुम्ही देखील नवीन वर्षांचा आनंद घ्या.

पाहता पाहता दिवस उडुन जातील,
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
Happy New Year 2023

संकल्प करूया.
साधा, सरळ, सोप्पा.
दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया.
हृदयाचा एक छोटासा कप्पा.
Happy New Year 2023

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे.
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे.
शिखरे यशाची सर तुम्ही करावी.
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी.
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
नववर्षाभिनंदन!

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या.
झेप घेऊया क्षितिजावर.
उंच उंच ध्येयाची शिखरे.
गगनाला घालूया गवसणी.
हाती येतील सुंदर तारे.
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे.
Happy New Year 2023

दुःख सारी विसरून जावू.
सुख देवाच्या चरणी वाहू,
स्वप्ने उरलेली, नव्या या वर्षी.
नव्या नजरेने नव्याने पाहू.
Happy New Year

पाकळी पाकळी भिजावी.
अलवार त्या दवाने.
फुलांचेही व्हावे गाणे.
असे जावो वर्ष नवे.
Happy New Year 2023

नव्या या वर्षी,
संस्कृती आपली जपूया,
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवूया.
Happy New Year 2023

Follow us on

Sharing Is Caring: