Hair Wash Rules: ज्योतिष शास्त्र (Astrology) हे फक्त राशी भविष्य आणि ग्रह नक्षत्रांची स्थिती आणि त्यांचा राशीवर होणारा परिणाम यापुरतेच मर्यादित नाही. ज्योतिष शास्त्रात व्यक्तीचे जीवन सुख-समृद्ध बनवण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत.
ज्योतिष शास्त्रात सांगितलेले हे नियम आता दुर्लक्षित होत आहेत परंतु याचा वाईट परिणाम लोकांना वेळोवेळी अडचणींचा सामना करून करावा लागत आहे.
दैनंदिन जीवनात व्यक्तीने आपली दिनचर्या कशी ठेवावी या बद्दल काही नियम ज्योतिष शास्त्रात आहेत. हे नियम नखे कापणे, केस धुणे आणि कपडे धुणे यासारख्या लहान सहान कामाच्या बाबतीत देखील आहेत.
Hair Wash Rules as per Astrology in Marathi
या गोष्टी करण्याचा योग्य दिवस आणि पध्द्त सांगितली आहे. या नियमांचे योग्य पालन केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि जीवनात सुख-समृद्धी प्रदान करते असे बोलले जाते.
महिलांनी जर ज्योतिष शास्त्रात सांगितलेले हे नियम पालन नाही केले तर माता लक्ष्मी अश्या महिलांवर क्रोधीत होतात आणि त्यांच्या घरातून निघून जातात.
ज्योतिष शास्त्रानुसार केस कोणत्या दिवशी धुवावेत
शुक्रवार : महिलांनी शुक्रवारच्या दिवशी केस धुणे शुभ मानले गेले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी केस धुणे शुभ आहे. या दिवशी केस धुण्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपले शुभ आशीर्वाद देते, याच सोबत शुक्रवार हा केस कापण्यासाठी देखील चांगला दिवस आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी केस धुणे टाळावे
बुधवार : ज्योतिष शास्त्रानुसार बुधवार च्या दिवशी ज्या महिला अविवाहित किंवा कुमारिका आहेत त्यांनी बुधवारी केस धुणे टाळावे. बुधवारी केस धुण्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते अशी मान्यता आहे.
शुभ दिवस : विशेषतः एकादशी, पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी केस धुणे टाळावे. जर तुम्ही एखाद्या खास कार्यक्रमाची तयारी करत आहेत किंवा एखादा विशेष सण असेल तर अगोदरच्या दिवशी केस धुणे योग्य राहील.
व्रत : व्रत असलेल्या दिवशी केस धुवू नयेत. ज्योतिष शास्त्रानुसार व्रत असल्याच्या एक दिवस अगोदर केस धुवून घेणे चांगले. काही कारणाने ते शक्य नसल्यास व्रत असलेल्या दिवशी केस धुवायचे असल्यास कच्चे दूध लावून केस धुवू शकता.
गुरुवार शनिवार : ज्योतिष शास्त्रानुसार या दोन दिवशी देखील केस धुवू नयेत. गुरुवारी केस धुण्यामुळे आर्थिक समस्या येऊ शकतात. तर शनिवारी चुकूनही केसांना धुवू नये त्याच सोबत तेल देखील लावू नये.