Thursday Remedies : हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित दिवस मानला गेला आहे. म्हणूनच हा दिवस श्रीहरीचा आशीर्वाद मिळविण्याचा सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूची पूजा करतात आणि उपवास केला जातो. या दिवशी केलेले उपाय जीवनात सुख आणि समृद्धी देतात. म्हणूनच धर्म आणि शास्त्रांमध्ये गुरुवारसाठी काही नियम आणि उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय कुंडलीत गुरु ग्रह मजबूत करतात. गुरू बलवान असल्यास जीवनात सौभाग्य वाढते, वैवाहिक सुखही मिळते. ज्या लोकांच्या कुंडलीत बृहस्पति कमजोर किंवा दुर्बल आहे त्यांनी गुरुवारी हे उपाय अवश्य करावेत. चला, जाणून घेऊया गुरुवारचे काही प्रभावी उपाय, ज्यामुळे पैशाचा ओघ वेगाने वाढतो.
गुरुवारचे प्रभावी उपाय
>> कुंडलीत गुरु ग्रह कमजोर असेल तर अशा व्यक्तीने गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली पाहिजे. केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते. तसेच केळीच्या झाडाखाली दिवा लावावा. असे केल्याने भरपूर संपत्ती मिळते असे मानले जाते. लग्न लवकर होते. लक्षात ठेवा गुरुवारी केळी खाऊ नयेत.
>> गुरूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी दर गुरुवारी पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान करावे.
>> गुरुवारी पिवळे कपडे परिधान केल्याने कामात यश मिळते. जातकास नशिबाची साथ मिळेल.
>> गुरुवारी व्रत (उपवास) ठेवल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी व्रत ठेवा आणि विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा करा. पूजेमध्ये पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा आणि हा प्रसाद स्वतः घ्या.
>> गुरुवारी सोने, हळद, हरभरा, पिवळी फळे इत्यादी पिवळ्या वस्तूंचे दान करा. गुरुवारी गुळाचे दान केल्याने खूप फायदा होतो.
>> पैशाच्या प्रवाहात किंवा प्रगतीमध्ये अडथळा येत असेल तर केळीच्या झाडाच्या मुळाचा तुकडा पिवळ्या कपड्यात बांधून गुरुवारी गळ्यात घाला. असे केल्याने सर्व अडथळे लवकर दूर होतील आणि वेगाने प्रगती सुरु होईल.