Jupiter Transit 2023: ज्योतिष शास्त्रात गुरु ग्रहाला विशेष महत्व दिलेले आहे. ज्ञान, शिक्षण, मुले, पिता-पुत्र इत्यादींच्या बाबतीत गुरु प्रभावी ठरतो. 2023 मध्ये गुरु ग्रह मीन राशी मधून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करत आहेत. गुरूच्या या राशी बदलाला गुरु गोचर (Guru Gochar 2023) म्हणतात.
गुरु मेष राशीत प्रवेश केल्यामुळे काही राशीला याचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे. मेष राशीत गुरूच्या प्रवेशामुळे (Jupiter Transit) अनेक राशींना त्याचा मोठया प्रमाणात लाभ होताना दिसणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी येणारे वर्ष आनंदाचे आहे.
मिथुन – मेष राशीत गुरूच्या गोचर होण्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना अनेक लाभ होणार आहे. या काळात या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढ होईल. नशिबाची पूर्ण साथ लाभेल. एवढेच नाही तर व्यवसायात प्रगती आणि नोकरीत बढती होऊ शकते. त्याच वेळी, गुरूचे गोचर उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळवून देतील.
कर्क – ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांच्या कुंडलीत गुरु ग्रह शुभ लाभ देऊ शकतो. करिअर मध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. एवढेच नाही तर उत्पन्नात नवीन भर पडण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच व्यक्तीच्या मान-सन्मानातही वाढ होऊ शकते.
कन्या – या राशीच्या लोकांना नवीन वर्षात प्रत्येक कामात यश पाहण्यास मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम वाढल्याचे दिसून येईल. व्यक्तीच्या आदर-सन्मानात वाढ होईल. या काळात एखादा घनिष्ठ मित्र भेटू शकतो.
तूळ – गुरूचे गोचर या राशीच्या लोकांसाठी नोकरीतही प्रगती घेऊन येत आहे. व्यवसायात लाभ मिळेल. या दरम्यान, बऱ्याच काळापासून रखडलेले काम पूर्ण होतील आणि व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
मीन – मीन राशीतून बाहेर पडल्यावरच गुरू मेष राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना भरपूर लाभही मिळतील. या काळात अचानक आर्थिक लाभ मिळेल. नोकरीत परिस्थिती चांगली राहील. जर तुम्ही बिजनेस करत असाल तर या काळात मोठी ऑर्डर मिळू शकते.