दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण झाल्यानंतर आता चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2022) होणार आहे. 15 दिवसांत 2 ग्रहणांचा देशापासून ते जगभरातील जनजीवनावर मोठा परिणाम होणार आहे.
Lunar Eclipse 2022 Date Time Effect
वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण (Lunar Eclipse) देव दीपावलीच्या दिवशी 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रहण शुभ मानले जात नाही. तर यावर्षी असा योगायोग घडला आहे की अवघ्या 15 दिवसांत 2 ग्रहण लागले आहेत. दिवाळीच्या एका दिवसानंतर 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण होते आणि आता 8 नोव्हेंबरला चंद्रग्रहण होणार आहे.
चंद्रग्रहण पौर्णिमेच्या रात्री होते
जेव्हा पौर्णिमेच्या रात्री सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच रेषेत असतात तेव्हा चंद्रग्रहण होते. पृथ्वी मध्यभागी असल्याने, त्याची सावली चंद्रावर पडते, जी कधीकधी त्याला एक आकर्षक लाल रंग देते. तर काही वेळा चंद्र झाकला जातो. येत्या ८ नोव्हेंबरलाही अशीच घटना घडणार आहे.
याआधीही यावर्षी १५ मे रोजी चंद्रग्रहण झाले आहे. आता 8 नोव्हेंबरचे चंद्रग्रहण हे दुसरे चंद्रग्रहण आणि शेवटचे चंद्रग्रहण असेल. योगायोगाने हा दिवस देव दीपावलीचाही आहे. देव दीपावली कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते, या दिवशी मंदिरांमध्ये विशेष सजावट केली जाते.
भारतात दिसणार चंद्रग्रहण?
८ नोव्हेंबरला होणारे चंद्रग्रहण भारतातील बहुतांश भागात दिसणार नाही. अशा स्थितीत ग्रहणाचा सुतक म्हणजेच वेध काळही लागू होणार नाही. हे खग्रास ग्रहण असून त्याचा वेध काळ वैध नाही. हे ग्रहण मंगळवार, 8 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:32 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6.18 वाजता संपेल.
हे चंद्रग्रहण फक्त भारताच्या पूर्व भागातच दिसणार आहे. यामध्ये कोलकाता, सिलीगुडी, पाटणा, रांची, गुवाहाटी यांचा समावेश आहे. याशिवाय काठमांडू, टोकियो, मनिला, बीजिंग, सिडनी, जकार्ता, मेलबर्न, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी, न्यूयॉर्क सिटी, लॉस एंजेलिस, शिकागो आणि मेक्सिको सिटी येथे चंद्रग्रहण दिसणार आहे.
चंद्रग्रहणाचा प्रभाव
ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा आणि मातेचा कारक मानला जातो. चंद्रग्रहणामुळे सर्व 12 राशींच्या मानसिक स्थितीवर आणि जीवनावर शुभ आणि अशुभ परिणाम होतील. चंद्रग्रहण काळात काही लोकांना तणाव, अनिर्णय, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्याचबरोबर त्याचा परिणाम देश आणि जगावरही दिसून येतो. यामध्ये हवामानाच्या प्रभावासारख्या घटनांचा समावेश आहे. ग्रहणाचे वाईट परिणाम टाळण्यासाठी ग्रहणानंतर नक्कीच स्नान करावे.