Breaking News

Chandra Grahan 2021 November: 580 वर्षा नंतर 19 नोव्हेंबर रोजी सगळ्यात मोठे आंशिक चंद्र ग्रहण

Biggest lunar eclipse 2021: खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहणांबद्दल नेहमीच खूप उत्सुकता असते. 2021 सालातील शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण असल्याचे म्हटले जात आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून चंद्रग्रहणाला खूप महत्त्व आहे.

शास्त्रात ग्रहण अशुभ मानले गेले आहे. असे मानले जाते की ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. पौराणिक कथेनुसार, ग्रहणाच्या वेळी राहू आणि केतू हे अशुभ ग्रह चंद्राला पकडतात. या स्थितीत चंद्रावर काही काळ ग्रहणअसते. याला चंद्रग्रहण म्हणतात.

तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये आल्यावर पृथ्वीची सावली चंद्रावर पडू लागते. या खगोलीय घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. खगोलशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की 19 नोव्हेंबर 2021 रोजी होणारे हे चंद्रग्रहण 580 वर्षांनंतरचे सर्वात मोठे आंशिक चंद्रग्रहण असेल. 19 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी होणाऱ्या या चंद्रग्रहणाविषयी जाणून घेऊया काही खास गोष्टी…

एमपी बिर्ला तारांगणातील संशोधन आणि शैक्षणिक संचालक देबीप्रसाद दुआरी यांनी सांगितले की, 19 नोव्हेंबर 2021 रोजी होणारे चंद्रग्रहण हे 580 वर्षांतील सर्वात मोठे आंशिक चंद्रग्रहण असेल.

2021 चे हे शेवटचे चंद्रग्रहण भारताच्या ईशान्य भागात थोड्या काळासाठीच दिसणार आहे. हे चंद्रग्रहण अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागात सूर्यास्ताच्या वेळीच पाहता येईल.

हे आंशिक चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.48 वाजता सुरू होईल आणि 4.17 वाजता संपेल.

अशा स्थितीत, या आंशिक चंद्रग्रहणाचा कालावधी 03 तास 28 मिनिटे 24 सेकंद असेल, जे 580 वर्षांतील सर्वात मोठे आंशिक चंद्रग्रहण असेल.

19 नोव्हेंबर 2021 रोजी हे आंशिक चंद्रग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि पॅसिफिक प्रदेशात दिसणार आहे.

यापूर्वी 18 फेब्रुवारी 1440 रोजी असे मोठे आंशिक चंद्रग्रहण झाले होते आणि पुढील वेळी असे आंशिक चंद्रग्रहण 08 फेब्रुवारी 2669 रोजी दिसणार आहे.

19 नोव्हेंबर 2021 रोजी, या आंशिक चंद्रग्रहणाचा पूर्ण प्रभाव दुपारी 2.34 वाजता दिसेल, जेव्हा चंद्राचा 97 टक्के भाग पृथ्वीच्या सावलीने झाकलेला असेल.

भारतात दिसणारे पुढील चंद्रग्रहण 08 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे.

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, वर्षातील हे शेवटचे आंशिक चंद्रग्रहण वृषभ आणि कृतिका नक्षत्रात होईल.

उपच्छाया चंद्रग्रहणामुळे हे भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध राहणार नाही.

About V Amit

आपल्यासाठी सर्वोत्तम माहिती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न असतो. जर आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपण आम्हाला फेसबुकवर फॉलो करू शकता.