Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्रामध्ये व्यवसाय, प्रेम, वैवाहिक जीवन इत्यादींशी संबंधित गोष्टींची चर्चा केली आहे. चाणक्याने आपल्या निती शास्त्रामध्ये प्रेम जीवन सुधारण्यासाठी अनेक धोरणे देखील दिली आहेत.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणांमध्ये अशा लोकांबद्दल देखील सांगितले आहे जे प्रेमाच्या बाबतीत कधीही चुकत नाहीत. चला तर मग आज अशा लोकांबद्दल जाणून घेऊया जे प्रेमाच्या बाबतीत कधीही अपयशी होत नाहीत आणि आपल्या जोडीदारालाही खुश ठेवतात.
सर्व महिलांचा आदर करा
आचार्य चाणक्य यांच्या मते, जो व्यक्ती सर्व महिलांचा आदर करतो. तो सर्व स्त्रियांकडे चांगल्या नजरेने पाहतो आणि त्याची पत्नी, मैत्रीण आणि आई यांचा नेहमी आदर करतो. अशा पुरुषांना आयुष्यात कधीही अपयश येत नाही. आचार्य मानतात की अशा लोकांना प्रेम आणि नातेसंबंधांचे महत्त्व चांगले समजते. अशा लोकांचे वैवाहिक जीवन आनंदाने व्यतीत होते आणि प्रेमसंबंध यशस्वी होतात.
कधीही अहंकार न करणारे लोक
आचार्य चाणक्य यांच्यानुसार प्रेमसंबंधांमध्ये अहंकाराला कधीही स्थान नसावे. प्रेम हा साधेपणाचा एक प्रकार आहे. प्रेमाच्या संबंधात अहंकार आला तर तुम्ही तुमच्या जोडीदाराला कमी लेखू लागता. त्यामुळे दुसरा पार्टनर स्वतःला कमकुवत समजू लागतो. त्यामुळे नात्यातील अंतर वाढत जाते.
आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक रहा
आचार्य चाणक्य यांच्या मते, जे पुरुष पूर्णपणे प्रामाणिक असतात ते इतर स्त्रियांकडे पाहत नाहीत. असे केल्याने त्यांच्या नात्याला कधीही हानी पोहोचत नाही. आचार्य मानतात की जो व्यक्ती आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवतो, त्यांचे नाते सुरळीत चालते.
दोघांचा सामान आदर
आचार्य चाणक्य यांच्या मते, जो पुरुष आपल्या जोडीदाराकडे आदराने पाहतो, त्यांचे नाते कधीही तुटत नाही. अशा लोकांना सर्वत्र सन्मान मिळतो. दुसरीकडे, जी व्यक्ती कधीही संपत्ती आणि प्रेमाचा अभिमान दाखवत नाही, त्यांचे नाते दीर्घकाळ टिकते.