Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी कमाई, खर्च, उपभोग आणि गुंतवणूक या विषयावर आपले विचार सविस्तर मांडले आहेत. चाणक्यच्या मते, पैसा मिळवणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच ते खर्च करणेही महत्त्वाचे आहे, परंतु चाणक्य नीती मध्ये पैशाच्या बाबतीत माणसाने केव्हा आणि कुठे सावध राहावे, हे खूप चांगले सांगितले आहे. त्यांचा अवलंब करून तुम्ही केवळ आर्थिकदृष्ट्या मजबूत बनू शकत नाही, तर तुम्ही एक यशस्वी व्यक्ती देखील होऊ शकता.
उपार्जितानां वित्तानां त्याग एव हि रक्षणाम्।
तडागोदरसंस्थानां परीस्रव इवाम्भसाम्।।
पैसे खर्च करणे महत्वाचे आहे
चाणक्य सांगतात की जर एखाद्या व्यक्तीला श्रीमंत व्हायचे असेल तर त्याला पैशाचा खर्च आणि ते वाचवण्याचे मार्ग माहित असले पाहिजेत. आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे वाचवणे अयोग्य आहे. चाणक्या यांनी उदाहरण दिले आहे की, तलावाचे पाणी जसे एका जागी जास्त वेळ राहिल्यास दुर्गंधी युक्त होते. त्याचप्रमाणे पैसे जास्त काळ ठेवल्याने त्याचे महत्त्वही कमी होते. दान हा पैसा खर्च करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. दान केल्याने पैसा कमी होत नाही तर दुप्पट होतो. योग्य गोष्टींमध्ये पैसा गुंतवावा. हे संपत्तीच्या संरक्षणासारखेच आहे.
सुरक्षित भविष्यासाठी पैसे बचत करा
चाणक्य यांच्या नुसार पैशाचा चांगला वापर केला पाहिजे, परंतु सुरक्षित भविष्यासाठी अनावश्यक खर्चाला आळा घालणे खूप महत्वाचे आहे. कमाईचा काही भाग दान करा तसेच पैसे गुंतवणुकीसाठी वापरा. आजच्या काळाबद्दल बोलायचं झालं तर, विमा, आरोग्य योजना, शिक्षण योजनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, ते केवळ कठीण काळात तुमची साथ देत नाहीत तर तुमचे भविष्य देखील सुधारतील.
पैशाचा आणि अहंकाराचा लोभ बाळगू नका
पैशाच्या लोभापायी माणूस चुकीच्या मार्गावर जातो. पैसा मिळवण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार होतो आणि कधीच आनंदी होऊ शकत नाही. चाणक्य म्हणतात की पैसा आला की गर्व करू नका. जे आपली संपत्ती दाखवतात ते गरिबीच्या उंबरठ्यावर येतात.
ही एक चूक राजाला रंक करते
पैसा नेहमी योग्य मार्गाने मिळवावा, कारण चुकीच्या पद्धतीने कमावलेला पैसा काही काळासाठीच आधार देतो. चाणक्याच्या मते, अनैतिक पद्धतीने केलेली कमाई लवकर नष्ट होते, अशा पैशाचे आयुष्य फक्त दहा वर्षे असते. या 10 वर्षांतही माणसाची संपत्ती पाण्यासारखी वाहत असते. एक ना एक कामात अनावश्यक खर्च करावा लागेल.