Chaitra Amavasya 2023 : चैत्र अमावस्येला वाईट शक्तींचा प्रभाव असतो, चुकूनही करू नका या 5 चुका

Chaitra Amavasya 2023 : चैत्र अमावस्या 21 मार्च रोजी आहे. अतृप्त आत्मा या दिवशी अधिक सक्रिय असतात. अशा स्थितीत काही गोष्टी अशा आहेत ज्या अमास्येच्या दिवशी करू नयेत. चला जाणून घेऊया चैत्र अमावस्येला काय करू नये.

अमावस्येला नकारात्मक शक्तींचा प्रभाव तीव्र होतो, अशी धार्मिक धारणा आहे. ज्यामुळे मानसिक व शारीरिक नुकसान होऊ शकते.चैत्र अमावस्येच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करण्याची परंपरा आहे. यावर पितर प्रसन्न होतात.

चैत्र अमावस्याच्या रात्री निर्जनस्थळी विशेषतः स्मशानाच्या जवळील सुमसान जागी जाऊ नये.

अमावस्या तिथीला शारी’रिक संबंध ठेवू नयेत. गरुड पुराणानुसार अमावस्येला शारी’रिक संबंध ठेवल्यानंतर जन्मलेल्या मुलाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

अमावस्या तिथी ही पूर्वजांना समर्पित आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांनी वाद घालू नये. असे म्हणतात की यामुळे पितरांच्या आत्म्याला त्रास होतो आणि त्यांचा आशीर्वाद मिळत नाही.

या दिवशी नशा आणि तामसिक भोजन करू नये, असे मानले जाते की यामुळे पितृदोष निर्माण होतो आणि पितरांचा कोप होतो. त्यामुळे आर्थिक नुकसान होते.

अमावस्येच्या दिवशी केस आणि नखे कापू नयेत. ज्योतिषांच्या मते असे केल्याने पितृदोष होतो.

Follow us on

Sharing Is Caring: