Budh Uday 2023 January: वैदिक ज्योतिष शास्त्रा (Astrology) मध्ये राशी भविष्याच्या दृष्टीने बुध हा ग्रह महत्वाचा आहे. बुध ग्रह हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. बुध ग्रह राशीच्या व्यापार, बुद्धी आणि तर्क यांच्या वर प्रभाव करतो. बुध ग्रहांची कृपा असलेल्या राशीचे लोक व्यापारात लाभ आणि नोकरी मध्ये उच्च पद प्राप्त करतात.
ज्योतिष शास्त्रा नुसार प्रत्येक ग्रह त्याच्या गती अनुसार ठराविक वेळेने आपली राशी बदलत असतो आणि ग्रहाचा उदय आणि अस्त होत असतो. जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या अतिशय जवळ जातो तेव्हा त्या ग्रहाचा अस्त झाला असे मानले जाते. बुध 31 जानेवारी 2022 रोजी अस्त झाला होता.

12 जानेवारी 2023 रोजी बुध पुन्हा उदय होणार आहे. बुध उदय होण्याचा लाभ 3 राशीच्या लोकांना होणार आहे. या तीन राशी तुला राशी, सिंह राशी आणि धनु राशी आहेत. या राशीच्या लोकांना काय लाभ होणार सविस्तर जाणून घेऊ बुध उदय 2023 राशी लाभ मध्ये.
तूळ राशी – नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या महिन्यात तूळ राशीच्या लोकांना बुधाच्या उदयाचा लाभ होणार आहे. या काळात तुमचे धैर्य आणि पराक्रम वाढेल. ज्या कामात तुम्ही हात लावाल त्यात तुम्हाला यश मिळेल. शत्रू वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील पण नुकसान करू शकणार नाही. करिअरच्या दृष्टीने हा काळ तुला राशीच्या लोकांसाठी अनुकूल आहे.
सिंह राशी – सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय लाभदायक ठरणार आहे.या काळात तुम्हाला आर्थिक आघाडीवर लाभ मिळेल. प्रवासाची शक्यता निर्माण होत आहे. संतानसुख मिळू शकेल.भावा बहिणीचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक समस्या दूर होतील.
धनु राशी – बुध उदयामुळे धनु राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम प्राप्त होतील. या काळात तुमच्या व्यवसायाला गती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या कामात तुम्हाला फायदा होईल. अविवाहितांसाठी विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो.