Budh Gochar: ज्योतिष शास्त्रानुसार 28 डिसेंबर महत्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी बुध गोचर होणार आहे. बुध राशी परिवर्तन करून मकर राशी मध्ये प्रवेश करत आहे. मकर राशीचा स्वामी शनि असल्यामुळे यास विशेष महत्व आहे.
बुध हा धन, व्यापार, बुद्धी आणि संवाद यांचा कारक आहे. बुध गोचर होण्याचा प्रभाव 12 राशीच्या बुद्धी, धन आणि वाणी यांच्यावर राहील. चला जाणून घेऊ बुध गोचर कोणत्या राशींसाठी लाभदायक राहणार.
या राशीसाठी बुध गोचर लाभदायक
मेष राशी : मेष राशीच्या करियर वर बुध गोचर प्रभाव करेल. या राशीच्या लोकांना त्यांच्या करियर मध्ये मोठे यश मिळू शकते. व्यापारी लोकांना त्यांच्या बिजनेस मध्ये तेजी दिसून येईल. मेष राशीचे उत्पन्न वाढेल. जे लोक नवीन नोकरी शोधत आहेत किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना यश मिळेल.
वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांना बुध नोकरी मध्ये प्रमोशन देऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते यामुळे तुमचा लाभ होईल. बिजनेस करणाऱ्या लोकांना फायदा होईल. अविवाहित लोकांचे विवाह जमण्याची शक्यता आहे.
कन्या राशी : धनाचा कारक बुध कन्या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ किंवा अडकलेले पैसे परत मिळणे इत्यादी मार्गाने धन लाभ शक्य. नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. पैसे वाचवण्यात यश मिळेल.
धनु राशी : धनु राशीच्या लोकांना हे बुध गोचर धनवान करेल. तुम्हाला तुमच्या वंशपरंपरागत संपत्ती मधून लाभ मिळू शकतो. तुमच्या वाणी मध्ये मधुरता येईल ज्यामुळे तुम्ही लोकांची मने जिंकू शकता. नोकरीच्या दृष्टीने हा काळ चांगला राहील.
मकर राशी : बुध तुमच्या राशीत गोचर करत आहे त्यामुळे तुम्हाला धन, बुद्धी आणि संवाद यामध्ये लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना पगारवाढ किंवा प्रमोशन मिळू शकते. जे लोक नवीन नोकरी शोधत आहेत त्यांना नोकरी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.