Budh Asta 2023: नवग्रहांमध्ये बुध हा एक महत्वाचा ग्रह आहे. बुध हा ग्रहांचा राजकुमार असल्याचे ज्योतिष शास्त्रात मानले जाते. बुध हा ग्रह बुद्धी, व्यापार आणि तर्क यांचा कारक ग्रह आहे. ज्या राशीवर बुध सकारात्मक प्रभाव पाडतो त्या राशीच्या लोकांना व्यापार आणि नोकरी मध्ये बुध ग्रह प्रगती आणि आर्थिक लाभ देतो.
बुध ग्रह 31 December 2022 रोजी अस्त झाला आहे आणि सुमारे 12 दिवसांनी 12 जानेवारी 2023 रोजी बुध पुन्हा उदय होणार आहे. पण तो पर्यंत बुध अस्त असल्यामुळे काही राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

बुध हा ग्रह संवाद, तर्क, व्यापार, मैत्री आणि बुद्धीचा कारक ग्रह आहे. त्यामुळे बुध अस्त असल्यामुळे याचा निगेटिव्ह प्रभाव 5 राशीवर होणार आहे. यामध्ये मेष राशी, मिथुन राशी, सिंह राशी, धनु राशी आणि कुंभ राशीचा समावेश आहे. चला जाणून घेऊ कोणत्या राशीवर बुध अस्त असल्याचा प्रभाव काय राहील.
हे पण वाचा : 12 जानेवारी रोजी बुध उदय झाल्यावर कोणत्या राशीवर धनवृष्टी करणार
मेष राशी – बुध मेष राशीच्या नवव्या भावात अस्त होईल. त्यामुळे बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. इतरांशी बोलताना तुम्हाला विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न करा. तुमचे बोलणे एखाद्याला भावनिक रित्या दुखवू शकते. यामुळे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. यासोबतच तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबतही जागरुक राहण्याची गरज आहे.
मिथुन राशी – मिथुन राशीच्या सातव्या भावात बुध अस्त होत आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांना काही काळ वाट पाहावी लागेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनाविषयी बोलताना, बुध धनु राशीमध्ये अस्त झाल्यामुळे आई आणि पत्नीमध्ये मतभेद निर्माण करू शकतो. नात्यात दुरावा वाढू शकतो.
सिंह राशी – सिंह राशीच्या लोकांसाठी बुध हा दुसऱ्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. या दोन्ही भाव संपत्तीपासून होणारा नफा यांच्याशी संबंधित आहेत. अशा स्थितीत तुम्हाला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, कारण बुध तुमच्या पाचव्या भावात अस्त करत आहे. सट्टेबाजी, शेअर बाजार आणि लॉटरी यांसारख्या शॉर्टकट मार्गाने पैसे कमवणे तुम्हाला अडचणीत आणू शकते. अचानक धनहानी होऊ शकते.
धनु राशी – धनु राशीत बुध अस्त होणार आहे. याचा परिणाम म्हणून तुम्हाला तुमच्या आरोग्याची सर्वात जास्त काळजी घ्यावी लागेल. तुमच्या वागण्यातही बदल दिसू शकतो आणि कधी कधी हे वर्तन तुमची प्रतिमा खराब करू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या वागण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
कुंभ राशी – कुंभ राशीच्या अकराव्या भावात बुधाचा अस्त झाला आहे. या काळात गुंतवणुकीशी संबंधित चुकीच्या निर्णयामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. अशा परिस्थितीत कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करू नका. कुंभ राशीचे विद्यार्थी जे चांगल्या प्लेसमेंटच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना कोणत्याही विलंबामुळे निराश वाटेल.